शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
7
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
8
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
9
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
10
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
11
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
12
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
13
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
14
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
15
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
16
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
17
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
18
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
19
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
20
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार

मोबाइल तिकीट सेवेला विलंब, आयआयटीएस कार्यप्रणालीत अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 04:44 IST

प्रवाशांची नाराजी : एनएनएमटीच्या आयआयटीएस कार्यप्रणालीत अडचणी

योगेश पिंगळे

नवी मुंबई : नवी मुंबई शहराबरोबर शेजारील शहरांमध्ये देखील वाहतुकीचे जाळे पसरविणारा नवी मुंबई परिवहन उपक्रम आर्थिक तोट्यात आहे. अनावश्यक होणारा तोटा भरून काढण्यासाठी, तसेच प्रवाशांना सुविधा देण्याच्या दृष्टीने महापालिकेने सुरू केलेल्या आयआयटीएस कार्यप्रणालीत विविध अडचणी येत आहेत. जीपीएस आणि ओबीट्सच्या साहाय्याने चालणाऱ्या मोबाइल अ‍ॅप आणि बस ट्रॅकर या सुविधा वापरताना प्रवाशांना अनेक वेळा चुकीची माहिती मिळत असल्याने विविध अडचणी येत आहेत. विलंब झालेल्या या सुविधेमधील स्मार्ट कार्ड आणि मोबाइल तिकिटिंग सेवा अद्याप सुरूच झालेली नाही. त्यामुळे प्रवाशांनी या सेवेवर नाराजी व्यक्त केली आहे.

नवी मुंबईतील नागरिकांना दळणवळणाची सुविधा उपलब्ध होण्यासाठी १९९६ साली नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्र माची स्थापना झाली. शहरातील नागरिकांना प्रवासाची सुविधा देण्याबरोबर कल्याण, डोंबिवली, उरण, मुंबई, पनवेल, ठाणे, मुंब्रा आदी शहराबाहेरील भागात देखील एनएमएमटीचे जाळे मोठ्या प्रमाणावर पसरले आहे. प्रवाशांना सुविधा देण्याच्या दृष्टीने परिवहन उपक्र माकडून आवश्यक असलेल्या मार्गावर बसची संख्या देखील वाढविण्यात आली आहे.राज्यातील इतर परिवहन उपक्रमांप्रमाणे नवी मुंबईची परिवहन सेवा देखील आर्थिक तोट्यात आहे. हा तोटा भरून काढण्याच्या दृष्टीने तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आयआयटीएस कार्यप्रणाली राबविण्याचा निर्णय घेतला होता. तसेच याबाबतचे काम २0१७ साली सुरू देखील करण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने मोबाइल अ‍ॅप, बस ट्रॅकर, स्मार्ट कार्ड, मोबाईल तिकिटिंग यासारख्या महत्त्वाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार होत्या. यामध्ये इंटरनेटद्वारे जीपीएस आणि ओबीट्सच्या साहाय्याने एनएमएमटी बसबाबतची माहिती एनएमएमटी कंट्रोल रूम आणि प्रवाशांना मोबाइल फोनवर उपलब्ध होणार होती. परंतु प्रत्यक्षात ही सुविधा वापरताना प्रवाशांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

मोबाइल अ‍ॅपवर इच्छित स्थळी प्रवासासाठी बस मार्ग, जवळचे बस स्टॉप आदी बाबी अनेक वेळा चुकीच्या दाखविल्या जात असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामध्ये इच्छित स्थळी प्रवासासाठी जवळ बस स्टॉप असताना देखील मोबाइल अ‍ॅपवर न दर्शविणे, बस स्टॉपवर येणाºया बसच्या वेळा चुकीच्या दाखविणे, इच्छित स्थळी जाणारी बस असताना देखील अ‍ॅपवर त्याबाबत माहिती न मिळणे. प्रवाशांना अशा अनेक अडचणींना अनेक वेळा सामोरे जावे लागत आहे. आयआयटीएस कार्यप्रणालीची सुविधा सुरू करण्याची वेळ संपली असताना देखील स्मार्ट कार्ड, मोबाइल तिकिटिंग या सुविधा तांत्रिक अडचणींमुळे अद्याप सुरू झालेल्या नाहीत. बस स्टॉपवर प्रवाशांना बसबाबत माहिती देणारे डिजिटल बोर्ड (पब्लिक इन्फॉर्मेशन सिस्टीम) देखील वारंवार नादुरु स्त होत आहेत. कोट्यवधी रु पये खर्च करून राबविण्यात येणारी आयआयटीएस सुविधा पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.आयआयटीएस प्रणालीमधील स्मार्ट कार्ड ही सुविधा येत्या १५ ते २0 दिवसात सुरू होणार आहे. मोबाइल अ‍ॅप आणि बस ट्रॅकर व्यवस्थितरीत्या काम करीत असून याबाबत अद्याप कोणत्याही तक्र ारी प्राप्त झालेल्या नाहीत. बस स्टॉपवर लावण्यात आलेल्या पीआयएस बोर्डची नासधूस करण्याच्या घटना घडत आहेत.- शिरीष आरदवाड, व्यवस्थापक, परिवहन उपक्र म 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईMobileमोबाइल