फेसबुकवरून बदनामी
By Admin | Updated: September 30, 2014 01:29 IST2014-09-30T01:29:20+5:302014-09-30T01:29:20+5:30
आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी ठाणो शहर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार रवींद्र फाटक यांनी केली आहे.

फेसबुकवरून बदनामी
>ठाणो : बनावट नावाद्वारे फेसबुकवर बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध करून आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी ठाणो शहर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार रवींद्र फाटक यांनी केली आहे. जिल्हाधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी आणि पोलीस आयुक्तांकडे त्यांनी लेखी तक्रार केली आहे.
बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध करून ‘गद्दार’ असे टाइप करण्यात आले असून व्यंगचित्रंद्वारे स्वत:सह पक्ष नेते व पक्षाची बदनामी केल्याचे फाटक यांनी निवडणूक निर्णय अधिका:यांच्या निदर्शनात आणले आहे. संबंधित बदनामीकारक मजकुराच्या प्रतीदेखील त्यांनी तक्रार अर्जास जोडल्या आहेत. फेसबुकवर o्रेया साळुंखे व निऊ थोरात या बनावट नावांचे खाते ओपन करून फाटक यांच्यासह त्यांच्या पक्षाची बदनामी करणारा
मजकूर प्रसिद्ध केल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. (प्रतिनिधी)