‘स्वच्छ पनवेल’ची घोषणा विरली हवेत

By Admin | Updated: November 28, 2014 00:25 IST2014-11-28T00:25:59+5:302014-11-28T00:25:59+5:30

व्यापारी आणि सोन्याच्या पेढय़ांचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या पनवेलला सध्या अस्वच्छतेचे ग्रहण लागले आहे.

The declaration of 'Clean Panvel' must have changed | ‘स्वच्छ पनवेल’ची घोषणा विरली हवेत

‘स्वच्छ पनवेल’ची घोषणा विरली हवेत

पनवेल : व्यापारी आणि सोन्याच्या पेढय़ांचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या पनवेलला सध्या अस्वच्छतेचे ग्रहण लागले आहे. नगरपालिकेच्या आरोग्य विभागातील सफाई कामगार इतर विभागांत वळविण्यात आल्याने शहरातील सफाईचा बोजवारा उडाला आहे. आधीच मनुष्यबळाची कमतरता आणि त्यात कामगारांची सुट्टीच्या निमित्ताने लागणारी अनुपस्थिती यामुळे ‘स्वच्छ पनवेल.. सुंदर पनवेल’ ही घोषणा हवेत विरली आहे. 
शहराचा विस्तार वेगाने होत आहे. या ठिकाणी लहान - मोठे मिळून सुमारे 5क् किलोमीटरचे रस्ते आहेत, त्याचबरोबर बाजारपेठ, शासकीय कार्यालय, भाजी व मासळी मार्केट, शोरुम, वेगवेगळी दुकाने या शहरात आहेत. पनवेल नगरपालिका दीड वर्ष जुनी असून ती अ दर्जाची आहे. शहरवासीयांना पायाभूत सुविधा पुरविण्याबरोबरच या परिसराची स्वच्छता राखण्याची जबाबदारी पालिकेवर आहे. आरोग्य विभागावर मोठी जबाबदारी आहे, मात्र एकीकडे ‘स्वच्छ पनवेल.. सुंदर पनवेल’चा नारा देणा:या सत्ताधारी आणि प्रशासनाला त्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही. फक्त सभेत ‘इथे कचरा राहिला, तिथे उचलला नाही, आरोग्य निरीक्षक काय करतात’ असे प्रश्न आणि टीका करण्याचेच काम नगरसेवक करतात. या खात्यात किती मनुष्यबळ आहे, याचे ऑडिट कोणी केलेले नाही. शहरात ज्यावेळी विशेष मोहिमा राबविण्यात येतात. खासगी ठेकेदारांचे कामगार घेतले जातात. प्रशासनाचे लाखो रुपये खर्च होत असून त्याबद्दल कोणाला काही पडलेले नाही. इतर विभागांनाही  कामगार मिळल्यामुळे ते मूग गिळून गप्प बसलेले दिसून येतात. 
 
सहाय्यक मुकादमपद 
निर्माण कोणी केले?
आरोग्य विभागात साफसफाई करण्याकरिता सहा टीम आहेत. त्यामध्ये एका मुकादमाची नियुक्ती करण्यात आली आहे. असे असतानाही काही अधिका:यांनी आपल्या मर्जीतील कामगारांना सहाय्यक मुकादम म्हणून स्वयंघोषित बढती दिली. ही मंडळी सफाईचे काम करीतच नाही. फक्त मुकादमगिरी करतात. त्यामुळे सहाय्यक मुकादम हे पद निर्माण कोणी केले, असा सवाल उपस्थित होत आहे. या व्यतिरिक्त नऊ कामगार असे आहेत की ते सफाईच्या कामाला हातच लावत नाहीत.
 
शहरात जमा होणा:या कच:याची खासगी एजन्सीच्या माध्यमातून विल्हेवाट लावणो, रस्ते व सार्वजनिक ठिकाणावरील स्वच्छता हे आरोग्य खात्याचे काम आहे. त्यासाठी एकूण 225 सफाई कामगार आणि चार आरोग्य निरीक्षक आहेत. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत हे मनुष्यबळ कमी आहे. असे असतानाही या विभागातील 29 सफाई कामगार फायर ब्रिगेड, एक खिडकी, प्रशासन, स्वागतकक्ष, जन्ममृत्यू नोंद, कर या ठिकाणी पाठविण्यात आले आहेत. गेल्या काही वर्षापासून हे कामगार आरोग्य विभागाकडे येतच नाहीत. त्यामुळे आज फक्त 184 कामगार आरोग्य खात्याकडे उरले असून त्यापैकी काही सुट्टी, दांडय़ा किंवा इतर कारणामुळे गैरहजर राहतात. हे बळ शहराच्या साफसफाईकरिता अपुरे आहे. 
 
पालिकेचा आरोग्य विभाग त्याचबरोबर इतरत्र कामगार आणि कर्मचा:यांची संख्या कमी आहे. नवीन पदे भरण्यासाठी प्रशासनाने जिल्हाधिका:यांकडे प्रस्ताव सादर केला आहे. त्यांच्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर नवीन भरती करण्यात येईल.
- मंगेश चितळे, मुख्याधिकारी, पनवेल नगरपालिका.

 

Web Title: The declaration of 'Clean Panvel' must have changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.