शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोरच डेब्रिजचे ढिगारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 00:57 IST

महापालिकेचेही दुर्लक्ष : रोडवर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाईची मागणी; तक्रारीकडे होत आहे दुर्लक्ष

नवी मुंबई : तुर्भे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोरच डेब्रिजचे डम्पिंग ग्राउंड तयार झाले आहे. महामार्गाच्या जोडरस्त्यावर मोठ्या प्रमाणात बांधकामाचा कचरा टाकला जात असून महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. मागणी करूनही कचरा उचलला जात नसल्याबद्दलही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

देशातील स्वच्छ शहरामध्ये सातवा क्रमांक आलेल्या नवी मुंबईमध्ये बांधकामाच्या कचºयाची समस्या गंभीर झाली आहे. मुंबई, ठाणे व मनपा क्षेत्रामधील बांधकामाचा कचरा शहरातील रोड, मोकळे भूखंड व एमआयडीसीसह शेतजमिनीवरही टाकला जात आहे. आडवली भुतावलीमध्ये डेब्रिजची टेकडी तयार झाली असून त्याचे पडसाद विधानसभेमध्येही उमटले होते. महापालिका अधिकाऱ्यांच्या छुप्या पाठिंब्यामुळे डेब्रिजमाफियांनी धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. तुर्भे गावाला लागून असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोरही मोठ्या प्रमाणात डेब्रिज टाकण्यात आले आहे. कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूपासून ते उड्डाणपुलाखाली व दत्त मंदिर परिसरापर्यंत १०० पेक्षा जास्त डम्परमधून डेब्रिज टाकण्यात आले आहे. महामार्गाला लागून जोडरस्त्यावरच मोठ्या प्रमाणात डेब्रिज टाकण्यात आले आहे. सरकारी कार्यालयाजवळच माफियांनी कचरा टाकला असल्यामुळे त्यांचे मनोबल किती वाढले आहे. या ठिकाणापासून महापालिकेचे विभाग कार्यालय ५०० मीटर अंतरावर आहे. यानंतरही या अतिक्रमणावर नियंत्रण मिळविता आलेले नाही. अशीच स्थिती राहिली तर पुढील काही दिवसांमध्ये येथील पूर्ण रोड डेब्रिजने व्यापला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.या ठिकाणी डेब्रिज टाकणाºयांवर कारवाई करण्यात यावी. आतापर्यंत टाकलेला सर्व कचरा उचलण्यात यावा. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रवेशद्वारापासून ते दत्तमंदिरपर्यंतच्या परिसराचे सुशोभीकरण करण्यात यावे. पुलाखालील जागेचेही सुशोभीकरण केले जावे, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

शिवसेनेचे विभागप्रमुख महेश कोठीवाले यांनी याविषयी महापालिका आयुक्तांना पत्र दिले आहे. आयुक्तांनी या परिसराची पाहणी करून योग्य उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांच्या कार्यालयाबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे, अशी मागणीही केली आहे. महापालिका प्रशासन स्वच्छ भारत अभियानादरम्यान शहरात अनेक ठिकाणी रंगरंगोटी करत आहे; परंतु या परिसरात होणाºया अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करत असल्याबद्दल नाराजीही व्यक्त केली आहे.

भरारी पथकाचा उपयोग नाहीनवी मुंबई महानगरपालिकेने डेब्रिज माफियांवर नियंत्रण मिळविण्यासाठी भरारी पथक तयार केले आहे. शहरामध्ये प्रत्येक विभागामध्ये भरारी पथकाने लक्ष ठेवले पाहिजे; परंतु या पथकातील कर्मचारी दुर्लक्ष करत असल्यामुळे माफिया बिनधास्तपणे सार्वजनिक वापराचे भूखंड व इतर ठिकाणी डेब्रिज टाकत आहेत. अडवली, भुतावली, इंदिरानगरमधील गणपतीपाडासह एमआयडीसमध्ये अनेक ठिकाणी डेब्रिजचे डम्पिंग ग्राउंड तयार केले असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे भरारी पथकाचा उपयोग काय? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. पालिकेने डेब्रिजमाफियांना रोखण्यासाठी कडक पावले उचलावी, अशी मागणी नागरिकांनी व्यक्त केली आहे.

महापालिका कार्यक्षेत्रामध्ये डेब्रिजची समस्या गंभीर झाली आहे. तुर्भेमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाजवळील रोडवर मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात आला असून तो उचलण्यात यावा. डेब्रिज टाकणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आम्ही केली आहे. - महेश कोठीवाले विभागप्रमुख, शिवसेना

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई