पांडवकड्यात तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 04:27 IST2017-08-02T04:27:39+5:302017-08-02T04:27:39+5:30
बंदी असतानाही पांडवकड्यावर गेलेला अस्लम महम्मद शेख (१९) याचा बुडून मृत्यू झाला. तो मानखुर्द येथून आपल्या दोन मित्रांसह सोमवारी पांडवकडा धबधब्यावर फिरण्यास आला होता.

पांडवकड्यात तरुणाचा मृत्यू
पनवेल : बंदी असतानाही पांडवकड्यावर गेलेला अस्लम महम्मद शेख (१९) याचा बुडून मृत्यू झाला. तो मानखुर्द येथून आपल्या दोन मित्रांसह सोमवारी पांडवकडा धबधब्यावर फिरण्यास आला होता.
पर्यटकांच्या सुरक्षेच्या कारणावरूनच वनविभागाने या धबधब्यावर प्रवेश बंदी घातली होती. याकरिता वनविभागाच्या कर्मचाºयांसह पोलिसांचा चोख बंदोबस्त पांडवकडा धबधब्यावर असतानाही, बंदी झुगारून मृत अस्लमसह त्याच्या साथीदारांनी पांडवकड्यावर प्रवेश केला. सोमवारी पांडवकडा धबधबा ओसंडून वाहत होता. अस्लम दोन मित्रांसह पोहण्यासाठी प्रवाहात उतरला. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने वाहत गेला. रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध लागला नव्हता. घटनेची माहिती खारघर पोलिसांना दिल्यानंतर मंगळवारी खारघर अग्निशमन दलामार्फत पोलिसांनी मृतदेहाचा शोध घेतला असता, सकाळी ८.३० वाजण्याचा सुमारास मृतदेह सापडला.