काशीद येथे पर्यटकाचा मृत्यू
By Admin | Updated: October 31, 2014 01:41 IST2014-10-31T01:41:57+5:302014-10-31T01:41:57+5:30
मुरूड तालुक्यातील काशीद समुद्रात सातारा येथील तिघे जण बुडाले असून एका पर्यटकाचा बुडून मृत्यू झाला, तर दोघांची प्रकृती अत्यवस्थ आहे.

काशीद येथे पर्यटकाचा मृत्यू
बोर्ली- मांडला : मुरूड तालुक्यातील काशीद समुद्रात सातारा येथील तिघे जण बुडाले असून एका पर्यटकाचा बुडून मृत्यू झाला, तर दोघांची प्रकृती अत्यवस्थ आहे. ओम्कार पवार असे मृताचे नाव असून, अनुप प्रताप तिबातले (23), सुमित बाळा रणपिसे (23) यांना अधिक उपचारासाठी अलिबागच्या सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे.
सातारा येथील ओम्कार, अनुप, सुमित यांच्यासहित एकूण सात पर्यटक येथे पर्यटनासाठी आले होते. सायंकाळी 6च्या सुमारास समुद्रस्नानासाठी ते समुद्रात गेले. ओम्कार, अनुप आणि सुमित यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडू लागले. तेथे असणा:या अन्य पर्यटक आणि ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना पाण्याच्या बाहेर काढले. (वार्ताहर)