ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

By Admin | Updated: June 10, 2017 01:19 IST2017-06-10T01:19:22+5:302017-06-10T01:19:22+5:30

भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराच्या मृत्यूची घटना सायन-पनवेल मार्गावर सीबीडी येथे घडली आहे. अपघातानंतर

The death of two-wheeler in the truck | ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराच्या मृत्यूची घटना सायन-पनवेल मार्गावर सीबीडी येथे घडली आहे. अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरून ट्रकसह पळ काढला आहे. त्याच्याविरोधात सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
विनारे लालाभाई मिश्रा असे अपघातातील मृत व्यक्तीचे नाव आहे. सायन-पनवेल मार्गावरून ते दुचाकीवरून (एमएच ०३ बीबी ३४६५) वाशीकडे जात होते. त्यांची दुचाकी सीबीडीजवळ मेट्रो पुलालगत आली असता, मागून आलेल्या ट्रकने धडक दिली. यात गंभीर जखमी झालेले मिश्रा घटनास्थळीच पडून होते. मात्र ट्रक चालकाने ट्रक (एमएच ४२ यू ९७६१) त्याठिकाणी न थांबवता घटनास्थळावरून पळ काढला. अखेर प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी ट्रकचा नंबर पोलिसांना कळवून अपघाताची माहिती दिली.

Web Title: The death of two-wheeler in the truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.