उष्माघातामुळे उलव्यात एका खेळाडूचा मृत्यू

By Admin | Updated: April 17, 2017 03:11 IST2017-04-17T03:11:45+5:302017-04-17T03:11:45+5:30

उलवे येथे आयोजित करण्यात आलेल्या टेनिस बॉल क्रि केट स्पर्धेदरम्यान, एका खेळाडूचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची

Death of a player due to heat stroke | उष्माघातामुळे उलव्यात एका खेळाडूचा मृत्यू

उष्माघातामुळे उलव्यात एका खेळाडूचा मृत्यू

पनवेल : उलवे येथे आयोजित करण्यात आलेल्या टेनिस बॉल
क्रि केट स्पर्धेदरम्यान, एका खेळाडूचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची
घटना रविवारी घडली. मंगेश रघुनाथ भगत (३४) असे या खेळाडूचे नाव असून, तो कोंबडभुजे येथील रहिवासी आहे.
उलवे येथील मैदानावर शनिवारी कोंबडभुजे प्रीमियर लीग क्रि केट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेतील एका सामन्यादरम्यान चेंडू पकडण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या मंगेशला मैदानात अचानक चक्कर आली. त्याला पनवेलमधील सहस्रबुद्धे या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यावर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती पनवेल शहर पोलिसांनी दिली. त्याच्या मृत्यूमुळे परिसरातनू हळहळ व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Death of a player due to heat stroke