तळोजातील ४ कामगारांचा मृत्यू

By Admin | Updated: March 25, 2016 00:58 IST2016-03-25T00:58:56+5:302016-03-25T00:58:56+5:30

तळोजातील केमिकल झोन परिसरातील डांबर कंपनीत लागलेल्या आगीत एकूण ८ कामगार गंभीर जखमी झाले होते. यापैकी ४ कामगारांचा गुरुवारी मृत्यू झाला असून चौघांची प्रकृती चिंताजनक

Death of 4 workers in the basement | तळोजातील ४ कामगारांचा मृत्यू

तळोजातील ४ कामगारांचा मृत्यू

तळोजा : तळोजातील केमिकल झोन परिसरातील डांबर कंपनीत लागलेल्या आगीत एकूण ८ कामगार गंभीर जखमी झाले होते. यापैकी ४ कामगारांचा गुरुवारी मृत्यू झाला असून चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
तळोज्यातील पडघे गावालगत असलेल्या प्लॉट जी १३ / ३ टिकिटार या डांबर कंपनीत शनिवारी रात्री अचानक भीषण आग लागली होती. या आगीत आठ कामगार होरपळले होते. त्यांच्यावर ऐरोलीतील नॅशनल बर्न सेंटरमध्ये उपाचार सुरू होते. यातील टुनटुन सिंग(४०), अखिलेश गुप्ता (३२) संजीव सिंग (३२) , संजय बासुमटारी (३०) या चौघांचा मृत्यू झाला तर आनंद सकपाळ (३७) , राहुल सिंग (२५), सुनिल साकरो बोरो (३३), पवन कुमार साहनी (४५) हे गंभीर आहेत. जखमींची प्रकृती चिंताजनक असून या प्रकरणी तळोजा पोलिसांनी टीकिटर या कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. कंपनीतील अग्निरोधक यंत्रणा बंद असल्याची माहिती यावेळी पोलिसांकडून देण्यात आली.

Web Title: Death of 4 workers in the basement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.