विजेच्या धक्क्याने १० वर्षाच्या मुलाचा मृत्यू

By Admin | Updated: May 11, 2016 02:07 IST2016-05-11T02:07:14+5:302016-05-11T02:07:14+5:30

आझादनगर येथे क्रिकेट खेळणाऱ्या १० वर्षाच्या मुलाचा विजेचा धक्का बसून मुत्यू झाला. त्यामुळे संतप्त नागरिकांनी मृतदेह घेऊन वीज मंडळावर मोर्चा काढला.

Death of a 10-year-old son by electric shock | विजेच्या धक्क्याने १० वर्षाच्या मुलाचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने १० वर्षाच्या मुलाचा मृत्यू

उल्हासनगर : आझादनगर येथे क्रिकेट खेळणाऱ्या १० वर्षाच्या मुलाचा विजेचा धक्का बसून मुत्यू झाला. त्यामुळे संतप्त नागरिकांनी मृतदेह घेऊन वीज मंडळावर मोर्चा काढला. अधिकाऱ्यांनी २० हजारांची तातडीची मदत दिली असून पाच लाखांची नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन दिले आहे.
उल्हासनगरच्या कॅम्प दोनमधील आझादनगर येथे भारत मार्बलसमोर काही मुले क्रिकेट खेळत होती. दुपारी १२ च्या सुमारास चेंडू शेजारच्या उघडया ट्रान्सफॉर्मरपाशी गेला. तो काढत असताना दहा वर्षाच्या प्रभाष जगदीप प्रजापती या मुलाच्या हाताला उच्च दाबाच्या वीज वाहिनीचा धक्का बसून त्याचा जागीच मुत्यू झाला. राष्ट्वादीचे पदाधिकारी कमलेश निकम, दिनेश रॉय आदीसह शेकडो नागरिकांनी त्यानंतर वीज मंडळाच्या कार्यालयावर धाव घेऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला. कार्यालयावर मृतदेहासह मोर्चा आल्याने अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांत घबराट पसरली. त्यांनी तातडीने २० हजारांची मदत दिली.
प्रभाष प्रजापती यांच्या कुटुंबाला पाच लाखाची नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन या वेळी वीज अधिकाऱ्यांनी दिल्यावर मोर्चा माघारी परतला.

Web Title: Death of a 10-year-old son by electric shock