भुईगावच्या समुद्रकिनारी आढळले मृत डॉल्फीन

By Admin | Updated: March 5, 2016 01:09 IST2016-03-05T01:09:28+5:302016-03-05T01:09:28+5:30

वसईच्या भुईगांव समुद्रकिनारी आज सकाळी मोठा डॉल्फीन मृतावस्थेत आढळून आला. दोन दिवसांपूर्वी डहाणूच्या समुद्रकिनारी असाच डॉल्फीन मृतावस्थेत सापडला

Dead dolphin found in the seaside of Bhuegaon | भुईगावच्या समुद्रकिनारी आढळले मृत डॉल्फीन

भुईगावच्या समुद्रकिनारी आढळले मृत डॉल्फीन

वसई : वसईच्या भुईगांव समुद्रकिनारी आज सकाळी मोठा डॉल्फीन मृतावस्थेत आढळून आला. दोन दिवसांपूर्वी डहाणूच्या समुद्रकिनारी असाच डॉल्फीन मृतावस्थेत सापडला. गेल्या आठ महिन्यात यापरिसरात किमान ८० डॉल्फीन आणि कासवे मृतावस्थेत आढळून आली आहेत.
समुद्रकिनारी सकाळी वॉकींगसाठी गेलेल्या गावकऱ्यांना हा डॉल्फीन दिसून आला. साडेसहा फुट लांबीच्या डॉल्फीनचे वजन सुमारे दोनशे किलो आहे. तो रक्तबंबाळ अवस्थेत होता. या आधी पालघर जिल्हयात विविध ठिकाणी किमान ८० डॉल्फीन आणि कासवे मृतावस्थेत आढळून आल्याची माहिती कोळी युवा शक्तीचे अध्यक्ष दिलीप माठक यांनी दिली.
गेल्या काही महिन्यांपासून ओएनजीसी या तेल कंपनीने समुद्राच्या तळाशी असलेल्या तेल विहीरींचे सर्व्हेक्षण सुरु केले होते. त्यासाठी समुद्रात मोठे स्फोट केले जात होते. त्यावेळी लाखो मासे मृत्युमुखी पडत होते. तसेच स्थलांतर करीत असल्याची तक्रार अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने केली होती. डॉल्फीन मृत्युमुखी पडण्यास ते ही महत्वाचे कारण होते, असेही कोळी यांनी सांगितले.
भुईगावच्या समुद्रकिनारी आढळलेल्या डॉल्फीन मोठ्या जहाजाच्या धडकेने जखमी होऊन मरण पावला असावा आणि भरतीच्या लाटेत किनाऱ्यावर आला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Dead dolphin found in the seaside of Bhuegaon