शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कर्जत शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 15:53 IST

कर्जत शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना ठेकेदार दत्तात्रेय सुपे शिळे आणि निकृष्ट दर्जाचे अन्न देत असल्याने विद्यार्थ्यांना ते घशाखालीही उतरविणे कठीण जात होते.

लोकमत न्यूज नेटवर्कनेरळ : कर्जत शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना ठेकेदार दत्तात्रेय सुपे शिळे आणि निकृष्ट दर्जाचे अन्न देत असल्याने विद्यार्थ्यांना ते घशाखालीही उतरविणे कठीण जात होते. अखेर जगणे असह्य झालेल्या विद्यार्थ्यांनी याविरोधात आवाज उठविताच प्रकल्प अधिकारी गजेंद्र केंद्रे यांनी ठेकेदार सुपे याच्यावर कारवाई करत त्याला काळ्या यादीत टाकून त्याचे बिलही रोखले आहे. बचत गटाकडे या विद्यार्थ्यांना जेवण पुरविण्याचा ठेका दिला आहे.या समस्येव्यतिरिक्त येथील विद्यार्थ्यांना अन्यही समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वसतिगृहाच्या इमारतीची अवस्था अतिशय दयनीय झाल्याने या विद्यार्थ्यांना तेथे राहणेही कठीण होत आहे. गळके छत, ओल्या भिंती, दमट कुबट वातावरण, बंद विद्युत उपकरणे, शौचालयाची पडझड, गढूळ पाणीपुरवठा अशा एक ना अनेक समस्या येथे विद्यार्थ्यांना भेडसावत असून गृहपाल याकडे लक्ष देत नसल्याने येथील विद्यार्थ्यांना नरकयातना भोगाव्या लागतआहेत.कर्जत शहरातील मुद्रे येथे एकात्मिक आदिवासी विकास पेण प्रकल्पाचे शासकीय आदिवासी वसतिगृह आहे. सध्या येथे पस्तीस विद्यार्थी आहेत. एक गृहपाल, एक सुरक्षा रक्षक, एक सफाई कामगार असे तीन कर्मचारी आहेत.गृहपाल डी.बी. सूर्यवंशी आहेत. त्यांनी या वसतिगृहातच निवास करणे बंधनकारक आहे, परंतु तेही या वसतिगृहात फारच कमी वेळ उपस्थित राहत असून अन्य ठिकाणी निवास करतात. याबाबत विचारणा केली असता येथे योग्य निवासस्थान नसल्याने अन्यत्र राहत असल्याचे सांगण्यात आले.या शासकीय आदिवासी वसतिगृहाला स्वत:ची हक्काची इमारत नसल्याने शहरातील मुद्रे येथील एका जीर्ण इमारतीत वसतिगृह चालविले जात आहे. भाडेतत्त्वावर असल्याने या इमारतीची डागडुजी करणे शक्य होत नाही असे संबंधित अधिकाºयाचे म्हणणे आहे. यामुळे याबाबत अधिकारी ही हतबल असल्याचे स्पष्ट होते.या शासकीय आदिवासी वसतिगृहाला स्वत:ची हक्काची इमारत नसल्याने शहरातील मुद्रे येथील एका जीर्ण इमारतीत वसतिगृह चालविले जात आहे. भाडेतत्त्वावर असल्याने इमारतीची डागडुजी करणे शक्य होत नाही. 

 

टॅग्स :Electionनिवडणूक