शहरवासीयांचा दसरा उत्साहात

By Admin | Updated: October 12, 2016 05:04 IST2016-10-12T05:04:21+5:302016-10-12T05:04:21+5:30

: उत्सव आला विजयाचा, दिवस सोने लुटण्याचा... नवे-जुने विसरून सारे, फक्त आनंद वाटण्याचा... अशा शुभेच्छा एकमेकांना देऊन नागरिकांनी दसरा मोठ्या उत्साहात

Dasara enthusiasts of the city dwellers | शहरवासीयांचा दसरा उत्साहात

शहरवासीयांचा दसरा उत्साहात

नवी मुंबई : उत्सव आला विजयाचा, दिवस सोने लुटण्याचा... नवे-जुने विसरून सारे, फक्त आनंद वाटण्याचा... अशा शुभेच्छा एकमेकांना देऊन नागरिकांनी दसरा मोठ्या उत्साहात साजरा केला. यानिमित्त शहरातील बऱ्याच ठिकाणी रावणाचे दहन करण्यात आले.
साडेतीनघरी नवी वाहने आणली, तर अनेकांनी गृहप्रवेश केला. सोन्याचा दिवस म्हणून ओळख असणाऱ्या या दिवशी अनेकांनी सोने-चांदीच्या खरेदीचा शुभ मुहूर्त गाठला. नवरात्रोत्सवातील घट पारंपरिक पद्धतीने मंगळवारी सकाळी हलविण्यात आले. घरातले देव आणि शस्त्रांची पूजा करून आपट्याची पाने वाहून दसऱ्याचा सण साजरा केला. यानिमित्ताने नातेवाईक आणि मित्रांना आपट्याची पाने देऊन दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. शहरात सप्तशृंगी माता, दुर्गा माता, संतोषी माता, मरीआई मंदिरात पारंपरिक पद्धतीने भव्य मिरवणूक काढून देवीचे सीमोल्लंघन करण्यात आले. या वेळी भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. नवरात्रोत्सव मंडळांनीही सायंकाळी देवीची मिरवणूक काढून उत्सवाची सांगता केली. (प्रतिनिधी)

Web Title: Dasara enthusiasts of the city dwellers