Danapeti caught thief in Chanatya; Thieves in police custody | दानपेटी चोरणा-या चोरट्याला रंगेहात पकडले; चोर पोलिसांच्या ताब्यात 
दानपेटी चोरणा-या चोरट्याला रंगेहात पकडले; चोर पोलिसांच्या ताब्यात 

पनवेल : बेलपाडा गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील दानपेटी चोरण्यासाठी आलेल्या चोरट्यांना ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पकडलेल्या चोराचे नाव झाकीर हुशेन नौसिद्दीन कुरेशी असे असून, तो तुर्भे येथील  इंदिरानगर झोपडपट्टीत राहणारा आहे. खारघर सेक्टर तीन बेलपाडा गावात मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात चोरट्यांनी विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरातील दानपेटी फोडून पेटीत जमा झालेली रोख रक्कम लंपास केली होती. ग्रामस्थांनी मंदिरातील सीसीटीव्हीचे फूटेज पोलिसांकडे सुपूर्द केले होते. मात्र चोरांचा सुगावा काही लागला नाही. सुरक्षेचा उपाय म्हणून मंदिरासमोरच मंडप डेकोरेटरचा व्यवसाय करणाऱ्या घरात सीसीटीव्ही नियंत्रण केले जात असे, मंगळवार रात्री चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून दानपेटी फोडण्याच्या तयारीत असताना निदर्शनास आल्याने त्यास रंगेहाथ पकडून चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी खारघर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .


Web Title: Danapeti caught thief in Chanatya; Thieves in police custody
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.