विक्रेत्यांनी केले नुकसान

By Admin | Updated: November 12, 2015 02:04 IST2015-11-12T02:04:21+5:302015-11-12T02:04:21+5:30

दिवाळी निमीत्त फटाका विक्रेत्यांनी शहरात सर्वत्र विनापरवाना होर्र्डींग लावले आहेत. संघटनेचे पदाधिकारी सत्ताधारी राष्ट्रवादी काँगे्रसचे असल्यामुळे

Damages done by vendors | विक्रेत्यांनी केले नुकसान

विक्रेत्यांनी केले नुकसान

नवी मुंबई : दिवाळी निमीत्त फटाका विक्रेत्यांनी शहरात सर्वत्र विनापरवाना होर्र्डींग लावले आहेत. संघटनेचे पदाधिकारी सत्ताधारी राष्ट्रवादी काँगे्रसचे असल्यामुळे महापालिकेचा महसुल प्रत्येक वर्षी बुडविला जात आहे. याशिवाय या विक्रेत्यांमुळे वाशी - तुर्भे रोडवर वाहतूक कोंडीही होवू लागली आहे.
नवी मुंंबईमध्ये सर्वाधीक फटाका विक्री वाशी परिसरात होत असते. पुर्वी पामबिच रोडवर फटाक्यांचे स्टॉल्स लावले जात होते. परंतू सुरक्षेच्या कारणास्तव तेथे परवानगी देणे बंद केले आहे. यामुळे वाशीमधील फटाका विक्रेत्यांना वाशी - तुर्भे रोडवर मसाला मार्केटच्या समोर नाल्याशेजारी जागा दिली जात आहे. पुर्वी या परिसरात फक्त तुर्भेमधील विक्रेत्यांना स्टॉल्स लावता येत होते. यामुळे गर्दी कमी व्हायची. परंतू वाशीतील विक्रेत्यांना परवानगी दिल्यामुळे ग्राहकांची प्रंचड गर्दी होत आहे. रोडवर वाहने उभी केल्यामुळे रात्री या मार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. दिवसाही वाहतूकिसाठी एकच लेन उपलब्ध होत आहे. फटाका विक्रेत्यांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काहीच उपाययोजना केलेल्या नाहीत. याशिवाय फटाका विक्रेत्यांनी सुरक्षेसाठी पुरेशी व्यवस्था केलेली नाही. अनेक स्टॉल्सचालकांनी आग विझविण्यासाठी फायरएक्स्टींविशर, पाणी व वाळूही ठेवलेली नाही.
वाशी नगर फटाका संघटनेन होर्डींगसाठी पालिकेची परवानगी घेतलेली नाही.
महापालिकेचा महसुल बुडवून फुकटची जाहीरात केली आहे. व्यापारी संघटनेमध्ये राष्ट्रवादी काँगे्रसचे पदाधिकारी आहेत. यामुळेच पालिका प्रशासन त्यांच्यावर कारवाई करत नाही. फटाका विक्रेता संघाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वत:चीही जाहीरात सुरू केली आहे.शहरात लावलेल्या होर्डींगवर वाशी नगर फटाका विक्रेता संघाचे अध्यक्ष म्हणून एक बाजूला मुकुंद विश्वासराव व दुसऱ्या बाजूला अनिल हेलेकर यांचा फोटो लावण्यात आला आहे. एकाच संघटनेचे दोन अध्यक्ष कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे. परंतू याविषयी प्रतिक्रिया विचारली असता विश्वासराव यांनी सांगितले की हेलेकर नवी मुंबई संघटनेचे अध्यक्ष आहेत.

Web Title: Damages done by vendors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.