शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

नेरुळच्या कोविड सेंटरमधील कामगारांच्या पगारावर डल्ला; तक्रारीला केराची टोपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2020 23:59 IST

ठेकेदारासह अधिकाऱ्यांची मिलीभगत?

सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : नेरुळ येथील कोविड सेंटरमध्ये हाउसकीपिंगचे काम करणाऱ्या कामगारांच्या पगारावर डल्ला मारल्याची बाब समोर आली आहे. काम करूनही अनेकांचे पूर्ण महिन्याचे वेतन देण्यात आलेले नाही, तर काहींच्या पगारातून ५ ते ३ हजार रुपये कापून घेण्यात आले आहेत. हे वेतन मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न करूनही कामगारांच्या पदरी निराशाच पडली आहे.

मागील काही दिवसांपासून पालिकेचे कोविड सेंटर वादाच्या भोवऱ्यात सापडू लागले आहे. कोरोनाच्या आडून मलिदा लाटला जात असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. अशातच कोविड सेंटरमधल्या कामगारांच्या वेतनावरही डल्ला मारला जात असल्याची बाब समोर आली आहे. 

ठेकेदारामार्फत नेमलेल्या नेरुळ सेक्टर ९ येथील अहिल्याबाई होळकर सेंटरमधील हाउसकीपिंग कर्मचाऱ्यांनी याबाबत तक्रार केली आहे. सुरुवातीला सपोर्ट फॅसिलिटीमार्फत कामगार नेमण्यात आले होते. ऑगस्टमध्ये त्यांच्याकडून काम काढून डी.एम. ग्रुप यांना देण्यात आले, परंतु नोव्हेंबरमध्ये शहरातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आल्याने, इतर काही केंद्रांसह नेरुळचे केंद्रही बंद करण्यात आले. यावेळी काही कामगारांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन न देताच घरचा रास्ता दाखविण्यात आला, तर काहींच्या वेतनातून ३ ते ५ हजार रुपये कापल्याचा आरोप होत आहे. 

सपोर्ट फॅसिलिटी कंपनीनेही जुलै महिन्याच्या वेतनातून प्रती कामगार ५ हजार रुपये कापल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. कोणत्याही कारणाशिवाय कापलेला पगार मिळविण्यासाठी मागील एक महिन्यापासून हे कामगार ठेकेदार व पालिका अधिकाऱ्यांकडे विनवण्या करत आहेत.

काही सुपरवायझरचे वेतन थांबविल्याचा आरोप कोरोनाच्या भीतीमुळे कोविड सेंटरमध्ये कामगार मिळत नसतानाही आर्थिक परिस्थितीमुळे अनेकांनी धोका पत्करला होता. त्यांच्याच पगारावर डल्ला मारून स्वतःचे खिशे भरले जात असल्याचा संताप व्यक्त होत आहे, परंतु संपूर्ण प्रकार सपोर्ट फॅसिलिटी ठेकेदारामार्फत घडला असून, आपण सर्वांचे वेतन अदा केले असल्याचे डी.एम. ग्रुपचे प्रवीण सेनेकर यांचे म्हणणे आहे. मात्र, त्यांनीही काही सुपरवायझरचे वेतन थांबविले असल्याचा कामगारांचा आरोप आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका