डहाणूत सहा महिन्यात 964 जणांना कुत्र्यांनी घेतले चावे
By Admin | Updated: December 13, 2014 22:39 IST2014-12-13T22:39:47+5:302014-12-13T22:39:47+5:30
भटक्या कुत्र्यांचा त्रस वाढला असून अनेक वेळा तक्रार करूनही पालिका याकडे लक्ष देत नसल्याने रात्री, बेरात्री येणा:या जाणा:या नागरीकांना श्वानांचा त्रस होत आहे.

डहाणूत सहा महिन्यात 964 जणांना कुत्र्यांनी घेतले चावे
शौकत शेख ल्ल डहाणू
डहाणू तालुक्यातील शहरी, ग्रामीण सह खेडय़ोपाडय़ात भटक्या कुत्र्यांचा त्रस वाढला असून अनेक वेळा तक्रार करूनही पालिका याकडे लक्ष देत नसल्याने रात्री, बेरात्री येणा:या जाणा:या नागरीकांना श्वानांचा त्रस होत आहे. डहाणूत गेल्या सहा महिन्यात 964 जणांना कुत्र्याने चावा घेतला आहे. विशेष म्हणजे मुंबईतील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी राज्य शासन विविध स्तरावर प्रय} करीत असते. परंतु ग्रामीण भागातील मोकाट कुत्र्यांचा उच्छाद रोखण्यासाठी कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे दिवसेंदिवस या परिसरात कुत्र्यांची फौज वाढत आहे.
डहाणू नगरपरिषद हद्दीतील डहाणूगाव, पारनाका, सतीपाडा, दुबळपाडा, लोणीपाडा, संत रोहिदासनगर, घाचिया, सरावली, इ. भागात रात्रीच्या अंधारात भटके कुत्रे फिरत असतात. एका एका ठिकाणी दहा ते बारा मोकाट कुत्रे असतात व एखादे वाहन किंवा नवीन चेहरा दिसल्यावर हे कुत्रे पाठीमागे लागतात. परिणामी शालेय विद्यार्थी, तसेच ज्येष्ठ नागरीक यांना जीव घेऊन कुणाच्या तरी घरात आo्रय घ्यावा लागतो. डहाणू पालिकेने गेल्यावर्षी भटक्या कु त्र्यांना बंदीस्त करून निर्बीजीकरण मोहिम राबवीली होती. परंतु गेल्या अनेक महिन्यापासून वारंवार तक्रार करून देखील सूस्त पालिका प्रशासन लक्ष देत नसल्याने श्वानदंशच्या घटनेमध्ये कमालीची वाढ होत आहे. त्यात लहान मुलांचा अधिक समावेश आहे. डहाणूच्या जंगलपट्टी तसेच पश्चिम किना:यावरील गावात तर मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. येथील गाव, खेडय़ोपाडय़ात रस्त्यावर, पथदिवे नसल्याने मध्यरात्री कामावरून येणा:या तसेच पहाटेच्या सुमारास काम, धंदा व्यवसाय निमित्त जाणा:या नागरीकांना चोर, दरोडेखोरापेक्षा जास्त भीती कुत्र्यांची असते. अशा भटक्या कुत्र्यांपासून स्वत:ला वाचविण्यासाठी नागरीक दिवशामध्ये दगड ठेवून ये-जा करीत असतात. दरम्यान शासनाने ग्रामीण भागातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. गेल्या आठ महिन्यात डहाणू नगर उपजिल्हा रूग्णालयात औषधोपचार करण्यात आले तर चिंचणी, वानगाव, गंजाड, कासा, तवा, घोलवड, सायवन, धुंदळवाडी या प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत कुत्र्यांनी चावे घेऊन जखमी केलेल्या 47क् जणांवर उपचार करण्यात आली.