शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

खारघर येथे बँकेवर दरोडा, पोलिसांनी बारा तासाच्या आत केली तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2017 23:01 IST

खारघर येथील बँकेवर दरोडा टाकणाऱ्या तिघांना पोलिसांनी बारा तासाच्या आत अटक केली आहे. बँकेतील लॉकर न तुटल्याने करोडो रुपयांची रक्कम चोरीला जाण्यापासून वाचली आहे. मात्र पकडले जाऊ नये या भीतीने त्यांनी बँकेतील  सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरून नेला होता.

नवी मुंबई, दि. 14 -  खारघर येथील बँकेवर दरोडा टाकणाऱ्या तिघांना पोलिसांनी बारा तासाच्या आत अटक केली आहे. बँकेतील लॉकर न तुटल्याने करोडो रुपयांची रक्कम चोरीला जाण्यापासून वाचली आहे. मात्र पकडले जाऊ नये या भीतीने त्यांनी बँकेतील  सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरून नेला होता.

खारघर सेक्टर ३० येथील कॅनरा बँकेच्या शाखेत हा प्रकार घडला. बुधवारी मध्यरात्री बँकेचे शटर उचकटून दरोडा टाकण्यात आला होता. यावेळी दरोडेखोरांनी खबरदारी म्हणून बँकेतील सर्व सीसीटीव्हीच्या वायरी तोडल्या होत्या. मात्र अनेक  प्रयत्न करूनही त्यांना बँकेतील रक्कम जमा असलेला लॉकर तोडता आला नाही. अखेर दरोड्याचा डाव फसल्यानंतर पळ काढताना त्यांनी सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरून नेला होता. गुरुवारी सकाळी हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर खारघर पोलिसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक दिलीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक नितीन थोरात, उपनिरीक्षक नितीन शिंदे, हवालदार शंकर जाधव, उमेश नवरे, किरण म्हात्रे यांचे पथक तयार करण्यात आले होते. त्यांच्याकडून तपास सुरु असताना त्याच रात्री परिसरात चोरटयांनी एक टपरी देखील फोडलेली असल्याचे निदर्शनास आले. त्याठिकाणी मिळालेल्या काही सुगाव्याच्या आधारे पोलिसांनी तात्काळ एका संशयिताला ताब्यात घेतले होते. अधिक चौकशीत त्याने साथीदारांसह टपरी व बँकेवर दरोडा टाकल्याची कबुली दिली. यानुसार इर्शाद अन्सारी (२०), रोहित मोरे (२२) व मुकेश आडे (२०) यांना गुरुवारी रात्री अटक केली आहे. तिघेही खारघरचे राहणारे असून गुन्हेगारी पार्शवभूमीचे आहेत. त्यांना बारा तासाच्या आत अटक करून खारघर पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला आहे. मात्र त्यांनी बँकेचा डीव्हीआर कुठे टाकला याची माहिती पोलिसांना अद्याप दिलेली नसून खारघर पोलीस अधिक तपास करत आहेत.  

टॅग्स :Crimeगुन्हा