डी. वाय. पाटील टी-२० क्रि केट स्पर्धेला सुरुवात

By Admin | Updated: February 20, 2016 02:07 IST2016-02-20T02:07:12+5:302016-02-20T02:07:12+5:30

बाराव्या आयडीबीआय फेडरल लाइफ इन्श्युरन्स डी. वाय. पाटील टी-२० क्रि केट स्पर्धेला नेरु ळच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये सोमवारपासून सुरुवात झाली आहे.

D. Y The beginning of the Patil T-20 Kite Kate tournament | डी. वाय. पाटील टी-२० क्रि केट स्पर्धेला सुरुवात

डी. वाय. पाटील टी-२० क्रि केट स्पर्धेला सुरुवात

नवी मुंबई : बाराव्या आयडीबीआय फेडरल लाइफ इन्श्युरन्स डी. वाय. पाटील टी-२० क्रि केट स्पर्धेला नेरु ळच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये सोमवारपासून सुरुवात झाली आहे. बीपीसीएल, इंडियन आॅईल, एअर इंडिया, टाटा स्पोर्ट्स क्लब, रिलायन्स वन, स्टेट बँक आॅफ त्रावणकोर, कॅनरा बँक, मुंबई कस्टम्स, ओएनजीसी, सेंट्रल रेल्वे, जैन इरीगेशन तसेच डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्टस अकादमीचे ग्रुप ए आणि बी अशा देशभरातील १६ संघांचा समावेश यामध्ये आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी २५फेबु्रवारी रोजी होणार असून, लिगसह सर्वच सामने क्रि केट रसिकांना मोफत पाहता येणार आहे.
२००४ सालापासून सुरू झालेल्या सदर स्पर्धेला दरवर्षी नवीन लूक देण्यात येत आहे. मिनी आयपीएल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डी. वाय. पाटील टी-२० स्पर्धेकडे उदयोन्मुख खेळाडू एक प्लॅटफॉर्म म्हणून बघत आहेत. या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारे आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय स्तरावर खेळणारे बहुसंख्य नामांकित क्रि केटपटू सहभागी होत आहेत. डी.वाय. पाटील क्रीडा संकुलात दोनही मैदानांवर दोन मॅच होणार असून २५० खेळाडूंचा संच याठिकाणी पहायला मिळणार असल्याचे अशी माहिती डी. वाय. पाटील स्पोर्टस अ‍ॅकॅडमीचे अध्यक्ष विजय पाटील यांनी दिली. आयपीएल आणि इतर स्पर्धांच्या आयोजनात आम्हाला हक्क मिळत नाहीत. पण, डी. वाय. पाटील टी-२० स्पर्धा ही नवी मुंबईकरांच्या हक्काची स्पर्धा आहे. या स्पर्धेच्या यशस्वीतेमध्ये नवी मुंबईकरांसह येथील मीडियाचेही मोलाचे योगदान आहे, अशी कबुली विजय पाटील यांनी यावेळी दिली. माजी क्रिकेटपटू अ‍ॅबी कुरुविल्ला, स्टेडियमचे व्यवस्थापक अविनाश साळवी यांनी स्पर्धेविषयी माहिती देताना यंदा या स्पर्धेसाठी सुमारे १५ लाखांची बक्षिसे ठेवण्यात आल्याची माहिती दिली.

 

Web Title: D. Y The beginning of the Patil T-20 Kite Kate tournament