पार्किंगच्या मुद्द्यावरून रणकंदन

By Admin | Updated: June 2, 2017 05:44 IST2017-06-02T05:44:58+5:302017-06-02T05:44:58+5:30

नगरपरिषदेच्या विशेष सभेत सुधारित विकास आराखड्यातील पार्किंग आरक्षणाच्या विषयावर सेना-भाजपामध्ये चांगलीच जुंपली

Crush on parking issue | पार्किंगच्या मुद्द्यावरून रणकंदन

पार्किंगच्या मुद्द्यावरून रणकंदन

लोकमत न्यूज नेटवर्क
उरण : नगरपरिषदेच्या विशेष सभेत सुधारित विकास आराखड्यातील पार्किंग आरक्षणाच्या विषयावर सेना-भाजपामध्ये चांगलीच जुंपली. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्यानंतर ठराव सेना सदस्यांच्या विरोधानंतर मंजूर झाला. मात्र, विशेष सभा संपताच सेना-भाजपा नगरसेवक आणि त्यांच्या समर्थकांनी परस्परांवर धावत जाऊन, माईक फेकून मारणे, बिस्लरी पाण्याच्या बाटल्या फेकल्या, शिवीगाळ, जीवे मारण्याच्या धमक्यांच्या प्रकारानंतर तर सभागृहातच रणकंदन माजले. उरण नगरपरिषदेने बुधवारी विशेष सभा बोलाविली होती.
फक्त तीन विषयांवर बोलाविण्यात आलेल्या बैठकीत पहिलाच विषय, सुधारित विकास योजनेतील पार्किंगसाठी आरक्षित ठेवण्यात आलेल्या मौजे चाणजे स.नं.८४मधील आरक्षण क्रमांक ४९, हा विषय चर्चेसाठी पुकारण्यात आला होता. सेनेचे नगरसेवक गटनेते गणेश शिंदे यांनी शासनाने याआधीच आरक्षण क्र. ४९ आणि ४९ अ असे दोन्ही पार्किंगच्या आरक्षित जागांचे आरक्षण कायम ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. तशा प्रकारचा जीआरही काढण्यात आला आहे. त्यामुळे हे आरक्षण बदलण्यामागे बिल्डर्सच्या फायद्याचे धोरण भाजपा सत्ताधाऱ्यांनी अवलंबिले असल्याचा आरोप करीत, या ठरावालाच सेनेने जोरदार विरोध केला. या विषयावरील चर्चेनंतर सेना-भाजपा नगरसेवकांमध्येच वादाला तोंड फुटले. नगरसेवकांमध्येच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. सत्ताधाऱ्यांनी पार्किंगचा ठराव सेनेच्या विरोधानंतरही संख्याबळाच्या जोरावर मंजूर करून घेतला.
विशेष सभा आटोपल्यानंतर दोन्ही गटांकडील नगरसेवक आणि त्यांचे समर्थक सभागृहातच एकमेकांशी भिडले. परस्परांवर धावत जाऊन माईक, पाण्याच्या बाटल्या फेकल्या, शिवीगाळ, जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या. शासकीय ठरावाची कागदपत्रेही शासकीय कर्मचारी नगरसेवकांच्या हातातून खेचण्याचे प्रकार घडले. सुमारे १० मिनिटे चाललेला गदारोळ मोठ्या प्रयत्नाने शांत झाला. याप्रकरणी सेनेचे गटनेते गणेश शिंदे यांनी भाजपा कार्यकर्त्यांविरोधात, तर भाजपा कार्यकर्त्यांनी शिवसेना नगरसेवक अशा परस्परविरोधी उरण पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत.

याप्रकरणी नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांनी सेनेचे गटनेते गणेश शिंदे यांना दोष दिला आहे. माजी नगराध्यक्षपद भूषविलेले असतानाही सभागृहात महिला नगराध्यक्षांशी कसे बोलावे? यांची गटनेत्यांना जाणीव नसावी, याबद्दल त्यांनी खेदही व्यक्त केला.
तर सुधारित विकास आराखड्यातील आरक्षण बदलण्यामागे बिल्डर्सला आर्थिक फायदा करून देणे, हाच भाजपाचा मूळ हेतू असल्याचा आरोप सेनेचे गटनेते गणेश शिंदे यांनी या वेळी
के ला.

Web Title: Crush on parking issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.