पनवेलमध्ये ख्रिस्ती दफनभूमीची तोडफोड

By Admin | Updated: March 25, 2017 01:35 IST2017-03-25T01:35:37+5:302017-03-25T01:35:37+5:30

खांदा वसाहतीमधील सीकेटी महाविद्यालय परिसरात असलेल्या ख्रिस्ती स्मशानभूमीची तोडफोड केल्याचा आरोप येथील ख्रिश्चन

Crusade of Christian burial ground in Panvel | पनवेलमध्ये ख्रिस्ती दफनभूमीची तोडफोड

पनवेलमध्ये ख्रिस्ती दफनभूमीची तोडफोड

पनवेल : खांदा वसाहतीमधील सीकेटी महाविद्यालय परिसरात असलेल्या ख्रिस्ती स्मशानभूमीची तोडफोड केल्याचा आरोप येथील ख्रिश्चन सिमेंटरी ट्रस्टने केला आहे. यासंदर्भात खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
खांदा वसाहतीमधील या ख्रिस्ती स्मशानभूमीच्या संरक्षण भिंतीचा वाद यापूर्वी न्यायालयातही गेला होता.
स्मशानभूमीला तीन ठिकाणी संरक्षण भिंत बांधण्यात आली असून, एक बाजू खुली असल्याने माथेफिरूने प्रवेश करून स्मशानभूमीची तोडफोड केल्याचा संशय ट्रस्टने व्यक्त केला असून योग्य तपासाची मागणी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Crusade of Christian burial ground in Panvel