शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

कोकणात पर्यटकांची गर्दी; कोरोनाचा पडला विसर, गोवा महामार्ग गजबाजला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2020 23:36 IST

कोरोनाचा पडला विसर; गोवा महामार्ग गजबाजला

दासगाव : बुधवारी सकाळपासूनच मुंबई-गोवा महामार्गावर कोकणात जाणाऱ्या वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या दिसून येत होत्या. एकच दिवसावर आलेल्या थर्टी फर्स्टसाठी कोकण आणि गोव्यामध्ये जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांची अचानक मुंबई-गोवा महामार्गावर गर्दी झाली होती. 

शासनाने कोरोनामुळे थर्टी फर्स्टसाठी जरी निर्बंध घालत संचारबंदी लागू केली असली, तरी मुंबई-गोवा महामार्गावरून कोकणात जाणाऱ्या वाहनांची गर्दी पाहिली, तर नागरिक मात्र यंदाही कोरोनाला बाजूला ठेवत थर्टी फर्स्ट दरवर्षाप्रमाणेच यंदाही जल्लोषात साजरे करतील, असे दिसून येत आहे.

एकच दिवसावर थर्टी फर्स्ट आला आहे. शासनाकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जेणेकरून गर्दी टाळली जाईल. दरवर्षी थर्टी फर्स्टच्या दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्याचप्रमाणे, प्रत्येक राज्य असो, जिल्हा असो, तालुका असो, जल्लोषात थर्टी फर्स्ट साजरा केला जातो.  यंदा शासनाने घातलेल्या निर्बंधमुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी कमी होईल, असे वाटत होते, परंतु आजच्या घडीला नागरिकांमध्ये कोरोनाची भीती राहिली दिसून येत नसून, थर्टी फर्स्ट साजरा करण्याचा जल्लोष आजही कायम आहे.

राज्यामध्ये कोरोना नियंत्रणात येत असला, तरी ब्रिटनमध्ये सापडलेल्या नव्या कोरोनाचे जवळपास वीस रुग्ण देश भरात आढळून आले आहेत. यामुळे देशभरात नवी चिंता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात रात्री अकरा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचार बंदी लागू केली आहे. संचारबंदीबरोबर विविध कार्यक्रमांवर निर्बंध लादले आहेत. मात्र, नागरिकांचा कल थर्टी फर्स्टकडे लागला असून, खबरदारीकडे दुर्लक्ष करत मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक कोकण आणि गोवा राज्याकडे वळले आहेत. याचा फायदा व्यावसायिकांना होत असला, तरी कोरोनाच्या प्रसाराबाबत धोकादायक ठरणार आहे.दरवर्षी आम्ही थर्टी फर्स्ट कोकणात येऊन साजरी करतो आता थोडा आनंद घेण्यासाठी बाहेर पडलो असून, दरवर्षीप्रमाणेच यंदाही साजरी करणार असल्याचे एका पर्यटकाने सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkonkanकोकण