अभय योजेचा लाभ घेण्यासाठी महापालिका कार्यालयांमध्ये गर्दी
By योगेश पिंगळे | Updated: March 15, 2023 14:58 IST2023-03-15T14:57:21+5:302023-03-15T14:58:20+5:30
नवी मुंबई महानगरपालिकेचा मालमत्ताकर हा उत्पन्नाचा सर्वात मोठा स्त्रोत असून या उत्त्पन्नातूनच शहरात विविध नागरी सुविधा कामे केली जातात.

अभय योजेचा लाभ घेण्यासाठी महापालिका कार्यालयांमध्ये गर्दी
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : शहरातील थकीत मालमत्ता कराची वसुली करण्यासाठी महापालिका प्रशासनाने अभय योजना जाहीर केली हाती. थकीत मालमत्ता करावरील व्याजावर ७५ टक्के सूट या योजेनचा बुधवारी १५ मार्च रोजी शेवटचा दिवस असल्याने करदात्यांनी महापालिका मुख्यालयासह विभाग कार्यालयांमध्ये या योजेनचा लाभ घेणयासाठी गर्दी केली होती.
नवी मुंबई महानगरपालिकेचा मालमत्ताकर हा उत्पन्नाचा सर्वात मोठा स्त्रोत असून या उत्त्पन्नातूनच शहरात विविध नागरी सुविधा कामे केली जातात. सन २०२२-२३ चे आर्थिक वर्ष ३१ मार्च २०२३ रोजी संपुष्टात येत असून तत्पूर्वी मालमत्ता कर थकबाकीदारांना दिलासा मिळावा व महापालिकेचा थकीत मालमत्ता कर वसूल होऊन ही रक्कम नागरिकांच्या सेवासुविधांसाठी उपलब्ध व्हावी. यासाठी महापालिका प्रशासनाने १५ फेब्रुवारीपासून ३१ मार्चपर्यंत थकीत मालमत्ता करावर सूट देणारी अभय योजना लागू केली होती. यामध्ये १५ फेब्रुवारीपासून १५ मार्चपर्यंत थकीत मालमत्ता कराच्या दंडात्मक रक्कमेवर ७५ टक्के इतक्या मोठ्या प्रमाणावर सूट देण्यात आली होती तसेच १६ मार्च ते ३१ मार्च या मार्चपर्यंत थकीत मालमत्ता कराच्या दंडात्मक रक्कमेवर ५० टक्के सूट देण्यात आली आहे.
या योजनेतील दंडात्मक रकमेवर ७५ टक्के सूट मिळविण्यासाठी बुधवारी शेवटचा दिवस असल्याने महापालिकेच्या विविध कार्यालयांमध्ये करदात्यांच्या गर्दी झाली होती. या योजनातील ७५ टक्के सवलतीचा काळ संपुष्ठात आल असून आज १६ मार्चपासून ३१ मार्चपर्यंत थकीत मालमत्ता कराच्या दंडात्मक रक्कमेवर ५० टक्के सूट असणार आहे. थकीत मालमत्ताकर धारकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.