कोपरा खाडीत मगरीचे दर्शन, दोन वर्षांपूर्वी या परिसरात दोन मगरी आढळल्या होत्या
By वैभव गायकर | Updated: April 5, 2024 18:12 IST2024-04-05T18:11:32+5:302024-04-05T18:12:17+5:30
सायन पनवेल महामार्गावर कोपरा खाडीपुलाखाली हि मगर आढळून आली आहे. दोन वर्षांपूर्वी या परिसरात दोन मगरी आढळल्या होत्या त्यानंतर दोन वर्षानंतर या मगरीचे दर्शन झाले आहे.

कोपरा खाडीत मगरीचे दर्शन, दोन वर्षांपूर्वी या परिसरात दोन मगरी आढळल्या होत्या
वैभव गायकर,पनवेल: खारघर मधील कोपरा खाडीत दि.5 रोजी दुर्मिळ अशा मगरीचे दर्शन झाले.या परिसरात मच्छिमारी करणाऱ्या मच्छिमार बांधवानी या मगरीचा फोटो टिपला आहे.यापूर्वी अनेक वेळा हि मगर खाडी किणारी आढळली आहे.
सायन पनवेल महामार्गावर कोपरा खाडीपुलाखाली हि मगर आढळून आली आहे.दोन वर्षांपूर्वी या परिसरात दोन मगरी आढळल्या होत्या त्यानंतर दोन वर्षानंतर या मगरीचे दर्शन झाले आहे. कोपरा खाडी मध्ये मोठ्या प्रमाणात जैव विविधता वास्तव्यास आहे.मगरीच्या दर्शनाने पुन्हा एकदा हे सिद्ध झाले आहे.खाडीलगत असलेल्या मॅन्ग्रोस मध्ये यापूर्वी कोल्ह्याना देखील पाहिले गेले आहे.नजीकच्या काळात खाडीत मोठ्या प्रमाणात दूषित पाणी सोडले जात असल्याने या पाण्यातील जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे.रसायन मिश्रित पाण्यामुळेच पाण्यातील जीव श्रुष्टीला धोका निर्माण झाला असल्याचा संशय पर्यावरण प्रेमी व्यक्त करीत आहेत.
कोपरा खाडीत मच्छिमारी करणारी साहिल कोळी यांनी या मगरीला पाहिले आहे.वारंवार याठिकाणी हि मगर निदर्शनास येत असल्याचे कोळी यांनी सांगितले.
खाडी किणारी मगर आढळली असल्यास आपण तिला पकडत नाही.कारण कि तिथे मगरिचा अधिवास असू शकतो.याबाबत माहिती घेऊन तत्काळ आमच्या पथकाला घटनास्थळी पाठवले जाईल.
- समीर शिंदे (रेंज फॉरेस्ट ऑफिसर,(मॅन्ग्रोस )नवी मुबई )