महिलेला छेडणाऱ्या दोघांना न्यायालयाचा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2015 00:07 IST2015-11-15T00:07:27+5:302015-11-15T00:07:27+5:30
मुंबईहून महड अष्टविनायकाच्या दर्शनासाठी आलेल्या महिला प्रवासी दर्शन घेऊन रिक्षाने खोपोली रेल्वे स्थानकाकडे जात असता अश्लील हावभाग करीत आणि जाणूनबुजून धक्का

महिलेला छेडणाऱ्या दोघांना न्यायालयाचा दणका
वावोशी : मुंबईहून महड अष्टविनायकाच्या दर्शनासाठी आलेल्या महिला प्रवासी दर्शन घेऊन रिक्षाने खोपोली रेल्वे स्थानकाकडे जात असता अश्लील हावभाग करीत आणि जाणूनबुजून धक्का मारणाऱ्या खोपोलीतील रिक्षाचालक वहाब करंजीकर याला खालापूर न्यायाधीश महेश सराफ यांनी २ वर्ष सक्तमजुरी व १० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.
मुंबईहून २५ वर्षीय तरुणी आपली बहीण व वडिलांसह २४ मार्च २०१३ रोजी महड येथे देवदर्शन करून रिक्षाने परतत असताना रिक्षाचालकाने जास्त प्रवासी घेतले. त्यानंतर तक्रारदार महिला व तिच्या बहिणीला चालकाच्या दोनही बाजूला बसवीत अश्लील हावभाव करीत विनयभंग केला. याबाबत खालापूर पोलिसांमध्ये तक्रार दाखल होताच पोलिसांनी रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. या प्रकरणी आरोपी वहाब करंजीकर याला २ वर्षे सक्तमजुरी, १० हजारांचा दंड व दंड न भरल्यास १५ दिवस साधी कैद अशी शिक्षा सुनावली. (वार्ताहर)