खानावळ व्यवस्थापकावर गुन्हा दाखल
By Admin | Updated: March 17, 2016 01:11 IST2016-03-17T01:11:57+5:302016-03-17T01:11:57+5:30
कामोठे येथील एमजीएम नर्सिंग महाविद्यालयातील ३६ विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधाप्रकरणी पोलिसांनी ठोस भूमिका घेत खानावळ व्यवस्थापकावर मंगळवारी

खानावळ व्यवस्थापकावर गुन्हा दाखल
कळंबोली : कामोठे येथील एमजीएम नर्सिंग महाविद्यालयातील ३६ विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधाप्रकरणी पोलिसांनी ठोस भूमिका घेत खानावळ व्यवस्थापकावर मंगळवारी रात्री गुन्हा दाखल केला. लवकरच त्याला अटक करण्यात येणार असल्याची माहिती कामोठा पोलीसांनी दिली. .
खानावळीचा व्यवस्थापक
रवींद्र पवार याच्यावर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डिसोजा यांनी दिली. (वार्ताहर)