धक्कादायक! आई वडिलांनीच दिले ११ वर्षीय मुलीला चटके; पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद
By सूर्यकांत वाघमारे | Updated: March 21, 2023 16:32 IST2023-03-21T16:31:52+5:302023-03-21T16:32:06+5:30
सिबीडी येथील टाटानगर झोपडपट्टी परिसरात एका सामाजिक संघटनेमार्फत पाहणी सुरु असताना रिटा गुप्ता (११) हि मुलगी घाबरलेल्या अवस्थेत आढळून आली होती.

धक्कादायक! आई वडिलांनीच दिले ११ वर्षीय मुलीला चटके; पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद
नवी मुंबई - अकरा वर्षीय मुलीला जबर मारहाण करून चटके दिल्याप्रकरणी तिच्या आई वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीडी बेलापूर परिसरात सामाजिक कार्यकर्त्यांमार्फत झालेल्या पाहणीत हा प्रकार उघड झाला. याप्रकरणी त्यांनी मुलीकडून घटनेची वाच्यता करून घेतल्यानंतर पोलिसांकडे तक्रार केली आहे.
सिबीडी येथील टाटानगर झोपडपट्टी परिसरात एका सामाजिक संघटनेमार्फत पाहणी सुरु असताना रिटा गुप्ता (११) ही मुलगी घाबरलेल्या अवस्थेत आढळून आली होती. यामुळे संघटनेच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी त्या मुलीला विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली. यामध्ये तिने आपल्याला आई वडिलांकडून अमानुष मारहाण होत असल्याचे सांगितले. त्याच्या खुणा तिच्या चेहऱ्यावर व पायावर चटके दिल्याच्या जखमा आढळून आल्या. त्यानुसार या घटनेप्रकरणी त्यांनी सीबीडी पोलिसांकडे तक्रार केली असता तिचे आई वडील नीलम गुप्ता व प्रमोद गुप्ता यांच्यावर सीबीडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.