न्यायालयातील अवैध कॅन्टीन जैसे थे

By Admin | Updated: October 12, 2015 04:28 IST2015-10-12T04:28:16+5:302015-10-12T04:28:16+5:30

भिवंडी येथील दिवाणी आणि फौजदारी न्यायालयांच्या आवारातील अनधिकृत उपाहारगृहाचा विषय ‘भिवंडी न्यायालयाचे कॅन्टीन अनधिकृत?’

The court was like an illegal canteen | न्यायालयातील अवैध कॅन्टीन जैसे थे

न्यायालयातील अवैध कॅन्टीन जैसे थे

अजय महाडिक, ठाणे
भिवंडी येथील दिवाणी आणि फौजदारी न्यायालयांच्या आवारातील अनधिकृत उपाहारगृहाचा विषय ‘भिवंडी न्यायालयाचे कॅन्टीन अनधिकृत?’ या मथळ्याखाली लोकमतने मांडल्यानंतर प्रभारी जिल्हा न्यायाधीश व्ही.व्ही. वीरकर यांनी शनिवारी (३ आॅक्टोबर) येथे भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यासंदर्भात त्यांनी भिवंडी तालुका वकील संघटनेशी चर्चा केली असल्याची माहिती अध्यक्ष अ‍ॅड. सुनील पाटील व सचिव अ‍ॅड. गणेश काबूकर यांनी लोकमतला दिली.
बुधवारी (७ आॅक्टोबर) वकील संघटनेने त्यांच्यासमोर या प्रकरणातील सर्व तथ्य मांडले असून याप्रकरणी उच्च न्यायालयाचे मार्गदर्शन घेण्यात येणार असल्याचे अ‍ॅड. प्रमोद हजारे यांनी लोकमतला सांगितले. दरम्यान, न्यायालयाला खेटून उभ्या असणाऱ्या या उपाहारगृह प्रकरणी वृत्ताची माहिती न्यायालयाच्या कार्यालयीन सहायक अधीक्षक एस.आर. चौधरी यांना प्रत्यक्ष दिल्यानंतरसुद्धा अजून कारवाई करण्यात आलेली नाही.

Web Title: The court was like an illegal canteen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.