शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

भाजपमध्ये प्रवेशासाठी नाराज नगरसेवकांची मनधरणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2019 06:01 IST

राजकीय घडामोडींना वेग; नवी मुंबईत राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या होणार बैठका

नवी मुंबई : गणेश नाईक यांच्यासोबत नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे आणि त्यांच्यासोबतचे ४६ नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असले, तरी जे ११ नगरसेवक भाजप प्रवेशास तयार नाहीत, त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न नेत्यांकडून सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ५२ व अपक्ष पाच नगरसेवक आपल्यासोबत असल्याचा दावा संदीप नाईक यांनी केला होता. मात्र प्रत्यक्षात तसे चित्र नसल्याने पालिकेत राष्ट्रवादीची सत्ता पूर्णपणे भाजपकडे जाणार नसल्याचे लक्षात आल्याने विद्यमान नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला नव्हता. माजी मंत्री गणेश नाईक यांच्यासोबत ठाणे जिल्ह्यातील विविध नगरसेवकांनीही प्रवेश केला, तर जिल्हा पातळीवर खिंडार पाडल्याचे चित्र उभे रहावे, यासाठी त्यांच्या निकटवर्तीयांची धडपड सुरू आहे. ही जुळवाजुळव पूर्ण झाल्यानंतरच नाईक भाजपमध्ये प्रवेश करतील.

राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांचे निकटवर्तीय नवी मुंबईतील माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेवक अशोक गावडे यांनी याआधीच राष्ट्रवादी सोडण्यास नकार दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राहण्याची इच्छा असलेल्या नगरसेवकांच्या संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले. नवी मुंबईतील राजकीय घडामोडींवर राष्ट्रवादीच्या नेत्यांचे लक्ष असून येत्या दोन दिवसांत त्यांच्या बैठका सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.२५ वर्षांपासून नागरिकांनी आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून संधी दिली आहे. भाजपमध्ये प्रवेशास नागरिकांचा विरोध आहे. प्रभागातील कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या असून पक्षांतर न करता राष्ट्रवादी पक्षातच राहावे, अशी भावना असल्याने आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार आहोत.- डॉ. जयाजी नाथ, नगरसेवक,राष्ट्रवादी काँग्रेसपक्षांतर न करण्यासाठी प्रभागातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भेटी घेतल्या आहेत. तशी प्रभागातील जनतेचीही भावना असल्याने सीबीडीमधील नगरसेवक नाथ, साबू डॅनियल असे आम्ही सारे राष्ट्रवादीमध्येच राहणार आहोत.- अशोक गुरखे, नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईNCPराष्ट्रवादी काँग्रेसGanesh Naikगणेश नाईक