नगरसेवक सूरज पाटील यांच्या कोठडीत वाढ !
By Admin | Updated: November 4, 2015 01:04 IST2015-11-04T01:04:07+5:302015-11-04T01:04:07+5:30
कुकशेत येथील शिवसैनिक मकरंद म्हात्रे याला मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवक सूरज पाटील व सहकाऱ्यांची पोलीस कोठडी बुधवारी संपत आहे. त्यानुसार नेरूळ

नगरसेवक सूरज पाटील यांच्या कोठडीत वाढ !
नवी मुंबई : कुकशेत येथील शिवसैनिक मकरंद म्हात्रे याला मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवक सूरज पाटील व सहकाऱ्यांची पोलीस कोठडी बुधवारी संपत आहे. त्यानुसार नेरूळ पोलीस त्यांना पुन्हा न्यायालयापुढे हजर करणार आहे. या प्रकरणात इतरही अनेक जण फरार असल्याने त्यांच्या शोधासाठी पोलिसांकडून पाटील यांच्या कोठडीत न्यायालयाकडे वाढ मागण्याची शक्यता आहे.
मंदिरावर कारवाई झाल्याच्या वादातून युवा सेनेचा मकरंद म्हात्रे या तरुणाला कुकशेतच्या काही तरुणांनी जबर मारहाण केलेली आहे. यामध्ये त्याचे दोन्ही पाय व हात फ्रॅक्चर झाला असून त्याच्यावर फोर्टीज रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा हल्ला नगरसेवक सूरज पाटील यांच्या इशाऱ्यावर झाल्याची तक्रार मकरंदने नेरुळ पोलिसांकडे केली आहे. त्यानुसार पोलिसांनी नगरसेवक सूरज पाटील यांच्यासह विशाल पाटील यांना घटनेच्या दिवशीच अटक केली होती. तर फरार असलेल्यांपैकी संदीप पाटील (२७), विनायक धोत्रे (३०) व सलमान दोरा यांना दोन दिवसांनी अटक केली. या प्रकरणात एकूण पाच जण अटकेत असून इतर फरार आहेत. सूरज पाटील यांना न्यायालयाने ४ नोव्हेंबरपर्यंतची पोलीस कोठडी दिली होती. त्यानुसार ही कोठडी बुधवारी संपत असल्याने नेरुळ पोलीस त्यांना पुन्हा न्यायालयापुढे हजर करणार आहेत. यावेळी पोलीस न्यायालयाकडे त्यांच्यात कोठडीत पुन्हा वाढ मागण्याची शक्यता आहे. या प्रकरणामुळे कुकशेत परिसरात सध्या राष्ट्रवादी विरुध्द शिवसेना असे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाकडे व पोलिसांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)