नगरसेवकांचे राजीनामासत्र सुरूच

By Admin | Updated: October 17, 2014 01:30 IST2014-10-17T01:30:47+5:302014-10-17T01:30:47+5:30

भाजपाचे राहुल दामले यांनी उपमहापौर आणि नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्याचे नाटय़ मागील आठवडय़ात घडले

Corporators resign their resignation | नगरसेवकांचे राजीनामासत्र सुरूच

नगरसेवकांचे राजीनामासत्र सुरूच

कल्याण : भाजपाचे राहुल दामले यांनी उपमहापौर आणि नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्याचे नाटय़ मागील आठवडय़ात घडले असतानाच स्थानिक पदाधिका:यांच्या मनमानीला कंटाळून येथील मनसेच्या नगरसेविका मीनाक्षी डोईफोडे यांनीदेखील बुधवारी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आहे. याबाबतचे राजीनामापत्र पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांना पाठविले आहे.
त्या प्रभाग क्रमांक 18, आधारवाडीच्या नगरसेविका आहेत. स्थानिक पदाधिका:यांच्या मनमानीमुळे राजीनामा देत असल्याचे कारण त्यांनी दिले आहे.
राजकारणात महिलांना 5क् टक्के आरक्षण मिळावे, हे पक्षाचे धोरण असताना पदाधिकारी याचा आदर न करता एकतर्फी निर्णय घेत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
यासंदर्भात ‘लोकमत’ने संपर्क साधल्यावर पक्षाला कार्यकर्ते महत्त्वाचे वाटतात़ नगरसेवकांना विश्वासात घेतले जात नाही. निर्णय प्रक्रियेत वारंवार डावलले जात़े हे पाहता पक्षाला नगरसेवकांची गरज राहिलेली नाही, असे दिसून येत़े त्यामुळे नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
 
च्यासंदर्भात मनसेचे कल्याण पश्चिमचे जिल्हाध्यक्ष दिनेश तावडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी डोईफोडे यांच्या राजीनाम्याबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचे सांगून अधिक बोलण्यास नकार दिला. 
च्मागील आठवडय़ात राहुल दामले यांनी राजीनामा दिल्याची घटना घडली होती़ त्यांच्याप्रमाणोच डोईफोडे यांनीही बुधवारी नगरसेवकपदाचा राजीनामा आयुक्त तसेच सचिव यांच्याकडे न पाठवता पक्षश्रेष्ठींकडे पाठविला आहे. 

 

Web Title: Corporators resign their resignation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.