शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
3
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
4
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
5
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
6
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
7
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
8
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
9
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
10
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
11
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
12
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
13
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
14
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
15
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
17
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
18
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
19
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
20
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ

पालिका निवडणुकीपूर्वी भाजपाला खिंडार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 11:39 PM

गणेश नाईकांना धक्का : सात आजी - माजी नगरसेवक राष्ट्रवादीमध्ये येणार; उपमुख्यमंत्र्यांची घेतली भेट

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : महापालिका निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षामध्ये खिंडार पडण्यास सुरुवात झाली आहे. गत आठवड्यात पाच नगरसेवकांनी शिवसेनेत जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. गुरुवारी भाजपच्या तीन नगरसेविका व चार माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन घरवापसी करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे माजी मंत्री गणेश नाईक यांना मोठा धक्का बसला आहे.नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. १ फेब्रुवारीला प्रभाग रचना जाहीर झाल्यापासून फोडाफोडीच्या राजकारणाला गती आली आहे. माजी मंत्री गणेश नाईक यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असणारे माजी स्थायी समिती सभापती पाच नगरसेवकांसह शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांनी गत आठवड्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली. यामुळे तुर्भे परिसरामध्ये भाजपला मोठे खिंडार पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यानंतर आता राष्ट्रवादीमध्येही घरवापसी सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये गेलेल्या शुभांगी पाटील, शशिकला पाटील व सलूजा सुतार यांनी पुन्हा राष्ट्रवादीमध्ये येण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत माजी नगरसेवक चंद्रकांत पाटील, विवेक पाटील, राजू शिंदे, संदीप सुतार हेही होते. यामुळे पुन्हा भाजपला खिंडार पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँगे्रसने भाजपमध्ये गेलेल्या इतरही नगरसेवकांना पुन्हा पक्षात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. कोपरखैरणेमधील माथाडी संघटनेशी संबंधित असलेला एक नगरसेवक व एक माजी नगरसेविकाही लवकरच स्वगृही परत येईल अशी चर्चा आहे.विधानसभा निवडणुकीपूर्वी माजी मंत्री गणेश नाईक यांनी ४८ नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. विधानसभा निवडणुकीमध्ये ऐरोली व बेलापूर या दोन्ही मतदारसंघांमधून अनुक्रमे संदीप नाईक व गणेश नाईक यांना तिकीट दिले जाईल अशी अपेक्षा होती. परंतु पक्षाने गणेश नाईक यांच्याऐवजी मंदा म्हात्रे यांच्यावर विश्वास दाखवून नाईक समर्थकांना धक्का दिला होता. शेवटच्या क्षणी संदीप नाईक यांनी त्याग केल्यानंतर ऐरोली मतदारसंघातून गणेश नाईक यांना उमदेवारी दिली होती. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यामुळे भाजपमध्ये गेलेल्या नगरसेवकांनी शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत पाच नगरसेवकांनी शिवसेनेत व तीन विद्यमान नगरसेवकांनी राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असून, हा भाजपला मोठा धक्का आहे. भाजपनेही शिवसेनेसह काँगे्रस व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना फोडण्याची तयारी सुरू केली असून, योग्य वेळी धमाका केला जाईल, असे भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.कुलकर्णी सोमवारी देणार राजीनामास्थायी समितीचे माजी सभापती व माजी मंत्री गणेश नाईक यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेले सुरेश कुलकर्णी पाच नगरसेवकांना व परिवहन समितीच्या माजी सभापतींना घेऊन शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. सोमवारी होणाºया महापालिकेच्या सर्वसाधारण सभेपूर्वी ते नगरसेवकपदाचा राजीनामा देणार आहेत.विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँगे्रसच्या नगरसेवकांवर दबाव टाकून भाजपमध्ये प्रवेश करण्यास लावला होता. यामधील अनेक नगरसेवक घरवापसी करणार आहेत. गुरुवारी तीन नगरसेविका व चार माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली असून, अजून काही नगरसेवक निवडणुकीपूर्वी घरवापसी करतील.- अशोक गावडे,जिल्हा अध्यक्ष, राष्ट्रवादी काँगे्रसभारतीय जनता पक्षातील एकही नगरसेवक अद्याप इतर पक्षामध्ये गेलेला नाही. ज्यांना महापालिका निवडणुकीमध्ये पक्षाचे तिकीट मिळणार नाही अशी भीती आहे ते स्वार्थासाठी इतर ठिकाणी जाण्याची चाचपणी करत असून त्याचा पक्षाच्या ताकदीवर काहीही परिणाम होणार नाही. इतर पक्षाचेही अनेक ज्येष्ठ पदाधिकारी आमच्या संपर्कात आहेत.- रामचंद्र घरत,जिल्हा अध्यक्ष,भाजप

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका