शहरं
Join us  
Trending Stories
1
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
2
भारताच्या अनेक चेक पॉईंटवर चीनचा कब्जा, केंद्र सरकारचं मौन, शशी थरूर यांचा आरोप
3
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
4
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
5
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
6
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
7
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
8
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
9
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
10
अल्पसंख्याक महिला करायची योगींचं समर्थन, अचानक गुंडांनी घरात घुसून केली मारहाण, त्यानंतर...
11
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
12
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
13
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
14
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
15
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
16
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
17
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
18
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
19
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
20
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."

नगरसचिवांचा वाढदिवस वादग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 3:58 AM

जेवणासाठी थर्माकॉलच्या प्लेटचा वापर : प्लास्टिकबंदीला मुख्यालयातच हरताळ

वैभव गायकर ।पनवेल : संपूर्ण प्लास्टिकबंदीचा ठराव मंजूर करणारी पनवेल ही राज्यातील पहिली व एकमेव महापालिका आहे. मनपाच्या निर्णयानंतर राज्य शासनाने संपूर्ण प्लास्टिकबंदी जाहीर केली आहे; पण या निर्णयाच्या अंमलबजावणीकडे मनपा प्रशासन दुर्लक्ष करत आहे. नगरसचिव अनिल जगधणी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्लास्टिकच्या प्लेटमधून जेवण देण्यात आल्याचे उघड झाले आहे.नगरसचिव जगधणी यांच्या वाढदिवसानिमित्त पालिकेतील कर्मचाऱ्यांना जेवणाच्या पार्टीचे आयोजन कारणात आले होते. चिकन आणि भाकरी, असा जेवणाचा थाट होता. मात्र, याकरिता थर्माकॉलच्या प्लेट्सचा वापर करण्यात आला होता. थर्माकॉलविक्रीला बंदी असताना पालिकेत या थर्माकॉलच्या प्लेट्स आल्याच कशा? हादेखील प्रश्न या वेळी उपस्थित होत आहे. एकीकडे पालिकेच्या मार्फत थर्माकॉल, प्लास्टिक बंदीकरिता जनजागृती केली जाते. विशेष म्हणेज, सार्वजनिक ठिकाणी उघडपणे या वस्तू आढळल्यास पालिका अधिकारी दंडात्मक कारवाई करीत असतात. मात्र, ज्या कार्यालयामधून यासंबंधी कारवाई केली जाते, त्याच ठिकाणी अशाप्रकारे थर्माकॉलचा वापर करणे, हे कितपत योग्य आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. नगरसचिव अनिल जगधणी यांच्या वाढदिवसानिमित्त या वेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पालिकेचे इतर अधिकारीही उपस्थित होते. त्यांना शुभेच्छा देतानाच्या सर्व अधिकाºयांच्या फोटोमध्ये समोर टेबलावर जेवणाची थर्माकॉलची प्लेट दिसत आहेत. हा फोटो पाहून सर्वांनाच चीड येणे साहजिकच आहे. पालिकेतील कर्मचाºयांनाच प्लास्टिक किंवा थर्माकॉल वापराबाबत जागरूकता नसेल, तर पनवेल महानगरपालिकेतील नागरिकांचे काय? विशेष म्हणजे, पालिका सचिवांच्या कार्यालयात अशाप्रकारे थर्माकॉलचा वापर सुरू असेल तर ही बाब आयुक्तांनीदेखील गांभीर्याने घेतली पाहिजे.भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत, याकरिता पालिकेला खबरदारी घ्यावी लागणार आहे. याकरिता आयुक्त गणेश देशमुख काय कारवाई करतात, याकडेही सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.यापूर्वी महापालिकेच्या एका कार्यक्रमामध्ये सत्कारासाठीचे बुके, हार व इतर साहित्य प्लास्टिकच्या पिशवीमध्ये आणल्याचे उघड झाले होते, यामुळे पनवेल महापालिकेमध्ये प्लास्टिकबंदी फक्त नावापुरतीच असल्याचे स्पष्ट झाले आहे.या घटनेची माहिती घेतली आहे. ही बाब गंभीर आहे. पालिकेत कोणताही कर्मचारी यापुढे अशाप्रकारे प्लास्टिक व थर्माकॉलच्या वस्तूंचा वापर करणार नाही, याकरिता तत्काल पत्रक काढले जाईल, असा प्रकार पुढे घडल्यास सक्त कारवाई करण्यात येईल. - गणेश देशमुख, आयुक्त, पनवेल महानगरपालिका

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी