शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
5
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
6
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
7
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
8
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
9
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
10
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
11
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
12
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
13
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
14
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
15
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
16
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
17
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
18
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
19
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
20
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप

coronavirus: नवी मुंबईमध्येही आरोग्य विभागावरील ताण वाढला, ५०१ आरोग्य कर्मचाऱ्यांची गरज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 2:49 AM

एक महिन्यात नवी मुंबईमधील  सक्रिय रुग्णांच्या संख्येत तब्बल चारपट वाढ झाली आहे. प्रतिदिन ७००पेक्षा जास्त रुग्ण वाढत असून आरोग्य विभागावरील ताण वाढू लागला आहे.

- नामदेव मोरे नवी मुंबई : एक महिन्यात नवी मुंबईमधील  सक्रिय रुग्णांच्या संख्येत तब्बल चारपट वाढ झाली आहे. प्रतिदिन ७००पेक्षा जास्त रुग्ण वाढत असून आरोग्य विभागावरील ताण वाढू लागला आहे. प्रमुख रुग्णालयांमध्ये बेड फुल झाले असून मनपाच्या केंद्रांमध्येही जागा अपुरी पडू लागली आहे. यामुळे बंद केलेली सर्व केंद्र पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत. डॉक्टर व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांचीही कमतरता असून तातडीने ५०१ कर्मचारी भरती करण्यासाठी कार्यवाही सुरू आहे.  (Stress on health department also increased in Navi Mumbai, 501 health workers needed)        नवी मुंबई पालिका कार्यक्षेत्रात एक महिन्यात ८३७४ नवीन रुग्ण वाढले असून रविवारी ७१७ रुग्ण वाढले आहेत. प्रादुर्भाव वाढू लाल्यामुळे आरोग्य विभागावरील ताणही वाढला आहे. बेड कमी पडू लागल्यामुळे यापूर्वी बंद केलेली सर्व कोरोना उपचार केंद्रे पुन्हा सुरू करण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत राधास्वामी सत्संग भवन, एपीएमसीमधील निर्यात भवन, एमजीएम सानपाडा व वाशीतील ईटीसी संस्थेमधील कोरोना उपचार केंद्र सुरू केली आहेत. उर्वरित केंद्रही लवकरच सुरू केली जाणार आहेत. नवीन केंद्र सुरू केल्यानंतर तेथे तज्ज्ञ डॉक्टर व इतर मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे आव्हान महानगरपालिकेसमोर उभे राहिले आहे. यापूर्वी तात्पुरत्या स्वरूपात भरती केलेल्या कर्मचाऱ्यांना रुग्ण कमी झाल्यानंतर कामावरून कमी केले होते. आता पुन्हा नवीन कर्मचारी वेळेत उपलब्ध करण्यासाठी महानगरपालिकेची धावपळ सुरू आहे. तब्बल ५०१ आरोग्य कर्मचारी भरती करण्यासाठीची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. वेळेत नवीन कर्मचारी मिळाले नाहीत तर आहेत त्या कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढणार आहे.  

पालिका प्रशासनाची कसरतप्रमुख खासगी रुग्णालयांमधील बेड फुल होऊ लागले आहेत. रुग्णवाढ अशीच सुरू राहिली तर सर्वांना योग्य उपचार मिळवून देण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे कर्मचारी वाढवून भार हलका करण्याचा प्रयत्न असणार आहे.  

उपचारांविषयी तक्रारी वाढू लागल्याकोरोना रुग्णांच्या  उपचारांसह चाचण्यांच्या वैधतेविषयी तक्रारीही वाढू लागल्या आहेत. तुर्भे इंदिरानगरमधील एक व्यक्तीचा एकाच दिवशी एका ठिकाणी पॉझिटिव्ह व एका ठिकाणी निगेटिव्ह रिपोर्ट आला. नेरुळमध्येही एकाचा पहिल्या दिवशी पॉझिटिव्ह व लगेच दुसऱ्या दिवशी निगेटिव्ह रिपोर्ट आल्याचे निदर्शनास आले आहे. सानपाडामध्ये क्वारंटाइन सेंटरमधील एका मुलाच्या उपचारांकडे दुर्लक्ष झाल्याचा व्हिडीओही सोमवारी व्हायरल होऊ लागला होता. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbaiनवी मुंबई