शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
3
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
4
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
5
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
6
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
7
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
8
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
9
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
11
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
12
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
13
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
14
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
15
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
16
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
17
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
18
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
19
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
20
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला

CoronaVirus News: झोपडपट्टीवासीयांनी रोखला कोरोनाचा प्रादुर्भाव; तुर्भेसह दिघ्यामध्ये रुग्णसंख्या घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2020 12:53 AM

घणसोली, ऐरोली व बेलापूर परिसरात बाधितांमध्ये वाढ

नवी मुंबई : शहरातील तुर्भेसह दिघामधील झोपडपट्टीवासीयांनी कोरोना नियंत्रणात आणण्यात यश मिळविले आहे. सर्वाधिक रुग्ण असलेल्या तुर्भे सहाव्या क्रमांकावर गेले आहे. दुसरीकडे सिडको विकसित नोडसह बैठ्या चाळींमध्ये झपाट्याने रुग्णवाढ होत असून, नेरुळसह कोपरखैरणत परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. झोपडपट्टीवासीयांएवढी जागरूकताही या परिसरातील नागरिकांना दाखविता आलेली नाही.नवी मुंबईमधील कोरोनाची आकडेवारी १८ हजारांच्या घरात पोहोचली आहे. महानगरपालिकेने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. काही ठिकाणी नागरिक सहकार्य करत नाहीत, तर काही ठिकाणी मनपाचे अधिकारी योग्य प्रकारे काम करत नाहीत. नवी मुंबईची रचना मूळगाव, सिडको विकसित परिसर व झोपडपट्टी अशी झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर, सुरुवातीला सर्वाधिक रुग्ण तुर्भे झोपडपट्टीमध्ये वाढू लागले होते. जूनअखेरपर्यंत तुर्भे विभाग कार्यालय परिसरात सर्वाधिक रुग्ण होते, परंतु तुर्भे नागरी आरोग्य केंद्राच्या वतीने विशेष परिश्रम घेऊन कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यात यश मिळविले. पहिल्या क्रमांकावर असलेले तुर्भे आता सहाव्या क्रमांकावर आहे. तुर्भे स्टोअर, इंदिरानगर या झोपडपट्टी परिसरातील रुग्णवाढ थांबली आहे. याच पद्धतीने दिघा झोपडपट्टी परिसरातील रुग्णवाढही नियंत्रणात आहे. नवी मुंबईमधील सर्वात कमी रुग्ण दिघा परिसरात आहेत. शहरातील झोपडपट्टी परिसरात प्रादुर्भाव थांबविण्यात यश आले असताना, सिडको विकसित नोडमध्ये मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव सुरूच आहे.नवी मुंबई मधील सर्वाधिक रुग्ण नेरुळ परिसरात आहेत. शुक्रवारपर्यंत येथील रुग्णसंख्या ३,२५१ झाली होती. या परिसरातील प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यात महानगरपालिकेस पूर्णपणे अपयश आले आहे. या परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर ठोस कारवाई होत नाही. मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करणारांवरही काहीच कारवाई होत नाही. नेरुळप्रमाणे कोपरखैरणेमधील स्थितीही बिकट आहे. बैठ्या चाळींमध्ये रुग्ण वाढत आहेत. घणसोली, ऐरोली व बेलापूर परिसरातही रुग्णवाढ सुरूच आहे.तुर्भे पॅटर्न राबविण्यात अपयशतुर्भे नागरी आरोग्य केंद्र परिसरात कोरोना नियंत्रणात आला आहे. यानंतर, संपूर्ण शहरात तुर्भे पॅटर्न राबविण्याची घोषणा झाली होती. इंदिरानगर, दिघा, कातकरीपाडा नागरी आरोग्य केंद्रातील डॉक्टर व तेथील यंत्रणेने परिश्रम करून कोरोना नियंत्रणात आणला आहे, परंतु इतर ठिकाणी मात्र रुग्णवाढ थांबविता आली नाही.वाशीमध्येही नियंत्रणनवी मुंबईमध्ये कोरोनाची सुरुवात वाशी नोडपासून झाली. फिलिपाइन्सवरून आलेल्या नागरिकांमुळे शहरात प्रादुर्भाव सुरू झाला. जवळपास दीड महिना वाशीमधील रुग्णसंख्या सर्वाधिक होती, परंतु सद्यस्थितीमध्ये येथील परिस्थिती नियंत्रणात येत असून, दिघानंतर सर्वात कमी रुग्ण या परिसरात आहेत.नियम तोडणाऱ्यांवर हवी कठोर कारवाई : झोपडपट्टी परिसरात महानगरपालिकेच्या नियमांचे व सूचनांचे काटेकोरपणे पालन केले जाते. मास्क न वापरणाऱ्यांवरही कारवाई केली जाते. यामुळे तुर्भेसह दिघामधील परिस्थिती नियंत्रणात येत आहे. दुसरीकडे सिडको विकसित नोड विशेषत: बैठ्या चाळीच्या परिसरात नियमांचे उल्लंघन होत आहे. नियम तोडणाºयांवर कडक कारवाई केली, तरच परिस्थिती नियंत्रणात राहण्याची शक्यता आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या