शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
2
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
3
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
4
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
5
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
6
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

CoronaVirus News: कोरोनाचा धोका वाढतोय... पालकांनो, लहान मुलांना जपा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2021 1:02 AM

संपूर्ण कुटुंबालाच विळखा : निष्काळजीपणामुळे स्फोट

- नामदेव मोरेनवी मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक धक्कादायक गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. संपूर्ण कुटुंबालाच विषाणूचा विळखा पडत आहे. लहान मुलांनाही प्रादुर्भाव होत असल्याचे निदर्शनास आले असून शहरवासियांनी स्वत:सह संपूर्ण कुटुंबीयांची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. लहान मुलांना जपण्याचीही आवश्यकता निर्माण झाली आहे. नवी मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. प्रतिदिन ७०० ते ९०० नवीन रुग्ण वाढत आहेत. शहरातील रुग्णसंख्या ६८ हजारपेक्षा जास्त झाली आहे. सात हजारपेक्षा जास्त रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्णालयातील खाटांची संख्या अपुरी पडू लागली आहे. मनुष्यबळ कमी पडत आहे. वाढणाऱ्या रुग्णांसाठी नवीन रुग्णालय सुरू करणे शक्य आहे. परंतु, वाढीच रुग्णालयांसाठी डाॅक्टर्स व इतर तज्ज्ञ मनुष्यबळ कसे उपलब्ध करायचे, असा प्रश्न आरोग्य विभागासमोर उभा राहिला आहे. दुसऱ्या लाटेत सर्वच वयोगटातील नागरिकांना कोरोनाचा धोका वाढत आहे. पहिल्या लाटेत लहान मुलांची संख्या कमी होती. परंतु, आता लहान मुलांमध्येही झपाट्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. २५ मार्चला ० ते १० वर्षे वयोगटातील ९० सक्रिय रुग्ण शहरात होते. पुढील एका आठवड्यात यामध्ये ९८ ची भर पडून सक्रिय रुग्णांची संख्या तब्बल १८८ वर पोहोचली आहे. प्रतिदिन १५ ते २२ लहान मुलांना कोरोनाची लागण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. लहान मुलांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण जास्त असले तरी त्यांच्यामध्ये कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणही जास्त आहे. आतापर्यंत १० वर्षे वयोगटातील फक्त एकाचाच मृत्यू झाला आहे. नवी मुंबईमध्ये एका घरातील व्यक्तीला कोरोना झाल्यानंतर त्यांच्या संपर्कात येणाऱ्या घरातील इतरांना कोरोनाची लागण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. संपूर्ण कुटुंबालाच कोरोनाचा विळखा पडत असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे नागरिकांनी कोरोना होणार नाही, याची काळजी घ्यावी. नियमांचे पालन करावे. लक्षणे दिसल्यास तत्काळ तपासणी करावी, असे आवाहन महापालिकने केले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एका व्यक्तीस कोरोना झाल्यानंतर त्याच्या संपर्कामुळे संपूर्ण कुटुंबालाच कोरोना होत असल्याचे निदर्शनास आले आहे. लहान मुलांनाही लागण होत आहे. लहान मुलांमध्ये कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण चांगले असले तरी मुलांची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करून स्वत:ला व कुटुंबीयांना कोरोनापासून वाचविले पाहिजे. - अभिजित बांगर, आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका लहान मुलांनाही कोरोनाची लागण होऊ लागली आहे. लहान मुलांमध्ये कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण चांगले आहे. परंतु, कोरोनाचे उपचार घेतल्यानंतर भविष्यात त्यांच्या आरोग्यावर काय परिणाम होणार, हे आताच सांगता येणार नाही. लहान मुले बरे होण्याचे प्रमाण चांगले असले तरी मुलांना कोरोना होणारच नाही, यासाठी पालकांनी योग्य काळजी घेतली पाहिले व नियमांचे पालन केले पाहिजे.     प्रवीण गायकवाड, बालरोगतज्ज्ञ 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या