शहरं
Join us  
Trending Stories
1
झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले
2
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
3
WI vs BAN Super Over : ९ चेंडूंची सुपर ओव्हर! ३ फुकटच्या धावा; तरी वेस्ट इंडिजसमोर बांगलादेशची फजिती
4
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
5
Womens World Cup : लाजिरवाण्या पराभवासह पाक संघ OUT; सेमीसह फायनल भारतात खेळवण्याचा मार्ग मोकळा!
6
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
7
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
8
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
9
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
10
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
11
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
12
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
13
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
14
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
15
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
16
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
17
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
18
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
19
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
20
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!

CoronaVirus News : नवी मुंबईने गाठला दहा हजारांचा टप्पा , १२५ दिवस अविरत संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2020 00:27 IST

नवी मुंबईमध्ये १३ मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. फिलीपाइन्सवरून आलेल्या नागरिकाला कोरोनाची लागण झाली. त्याच्यापासून त्याचे इतर सहकारी व वाशीमधील एका कुटुंंबातील जवळपास सात जणांना लागण झाली.

- नामदेव मोरेनवी मुंबई : सुनियोजित शहराचा बहुमान मिळविलेल्या नवी मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या १०,२७३ झाली आहे. १२५ दिवसांमध्ये दहा हजारांचा टप्पा पूर्ण झाला. आतापर्यंत ३१८ जणांना प्राण गमवावे लागले असून, प्रसार रोखण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. अपयश झाकण्यासाठी शासनाने आयुक्तांची बदली केली असून, नवीन आयुक्त नवी मुंबई कोरोनामुक्त करण्याचे आव्हान कसे पेलणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.नवी मुंबईमध्ये १३ मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. फिलीपाइन्सवरून आलेल्या नागरिकाला कोरोनाची लागण झाली. त्याच्यापासून त्याचे इतर सहकारी व वाशीमधील एका कुटुंंबातील जवळपास सात जणांना लागण झाली. पहिला रुग्ण सापडल्यानंतर सर्वप्रथम तो आपल्या शहरातील नाहीच, हे दाखविण्याचा खटाटोप काही अधिकाऱ्यांनी केला होता, परंतु दुसºयाच दिवशी रुग्ण सापडलेल्या परिसरात जाणारे रस्ते सील करण्यात आले. रोडसह सर्व परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. शहरातही कोरोनाचे आगमन झाले असल्यामुळे, महानगरपालिकेने उपाययोजना करण्यास सुरुवात केली. यानंतर, देशभर लॉकडाऊन सुरू झाला, परंतु त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी नवी मुंबईमध्ये झाली नाही. मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमिती व शहरातील किरकोळ भाजीपाला विक्रीची दुकाने सुरूच राहिली. खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होऊ लागली व कोरोना रुग्णांची संख्या टप्प्याटप्प्याने वाढतच गेली. ४३ दिवसांनी २४ एप्रिल रोजी कोरोना रुग्णांचे पहिले शतक पूर्ण झाले. पहिला रुग्ण सापडल्यानंतर ६४ दिवसांनी १ हजाराचा टप्पा पूर्ण झाला. त्यानंतर, रुग्णांची वाढ झपाट्याने होत गेली व १५ जुलैला रुग्णांचा आकडा दहा हजार झाला आहे.शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. रुग्णांची संख्या पाच हजार झाल्यानंतर, २३ जूनला मनपा आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची शासनाने बदली केली, परंतु महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती करून बदली थांबविली. यानंतर, १४ जुलैला रुग्णसंख्या दहा हजारांच्या टप्प्यावर पोहोचल्यानंतर पुन्हा त्यांची बदली करण्यात आली आहे. सद्यस्थितीमध्ये महापालिकेच्या कागदावर रुग्णांसाठी पुरेशी व्यवस्था आहे, परंतु प्रत्यक्षात रुग्णालयामध्ये जागा उपलब्ध होत नाही. आयसीयू युनिटची संख्या कमी आहे. आॅक्सिजनची व्यवस्था असणाºया बेडची संख्याही कमी पडत आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६१ टक्क्यांवर पोहोचले असले, तरी कोरोनाबळींचा आकडा वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षितता वाढत आहे. नवीन आयुक्त अभिजीत बांगर कशा प्रकारे ही परिस्थिती हाताळणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.नागरिकांचाही निष्काळजीपणा : नवी मुंबईमधील अनेक नागरिक लॉकडाऊनच्या नियमांचे कोटेकोर पालन करत आहेत. स्वत:च्या व कुटुंबीयांची काळजी घेत आहेत, परंतु जवळपास ३० टक्के नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. मास्क, सॅनिटायझर व सुरक्षेसाठीच्या इतर उपाययोजनांचा अवलंब करत नाहीत. नियम धाब्यावर बसविणाऱ्यांचा फटका नियम पाळणाºयांनाही बसत आहे. सर्व भार शासन व प्रशासनावर टाकून निष्काळजीपणा करणाºयांमुळे कोरोना रुग्णांची संख्या कमी न होता, वाढतच चालली आहे.उपाययोजना आहेत, अंमलबजावणी नाहीकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिकेने अनेक उपाययोजना केल्या. नवीन रुग्णालय उभे केले. खाससी रुग्णालयांची मदत घेतली जात आहे. लॉकडाऊन सुरू केला आहे, परंतु लॉकडाऊनच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जात नाही. रुग्णालयांमध्ये बेड शिल्लक असल्याचे सांगितले जाते,परंतु प्रत्यक्षात कोरोना झालेल्या रुग्णांना वेळेत रुग्णालयात भरती केले जात नाही. आॅक्सिजन बेड व व्हेंटिलेटर उपलब्ध होत नाहीत. अनेक चांगले निर्णय घेण्यात आले, परंतु त्यांची ठोस अंमलबजावणी केली नाही. यामुळे रुग्णसंख्या आटोक्यात येत नाही.मुंबई बाजारसमितीची डोकेदुखीनवी मुंबईमध्ये सर्वाधिक रुग्ण मुंबई बाजारसमितीमुळे वाढले आहेत. मुंबई व नवी मुंबईमधील नागरिकांना जीवनाश्यक वस्तंूचा पुरवठा करता यावा, यासाठी बाजारसमिती सुरू ठेवली आहे. शहरात लॉकडाऊन आहे, परंतु बाजारसमितीमध्ये रोज २५ ते ३० हजार नागरिकांची गर्दी होत आहे. खरेदीसाठी मुंबईच्या कानाकोपºयातून ग्राहक येत आहेत. बाजारसमिती सुरू असल्यामुळे शहरातील लॉकडाऊनला काहीही अर्थ राहिलेला नाही.शहरातील कोरोनाची स्थितीएकूण चाचणी - २७,२४९एकूण निगेटिव्ह - १६,४१४रुग्ण - १०,२७३मृत्यू - ३१८कोरोनामुक्त - ६,३५०उपचार सुरू - ३,६५०होम क्वारंटाईन - ५५,९६३क्वारंटाईन पूर्ण - ६६,९४८महानगरपालिकेने केलेली व्यवस्थारुग्णालय प्रकार बेडक्षमता वापर शिल्लककोविड केअर सेंटर २,१५४ ७७६ १,३७८कोविड हेल्थ सेंटर ७८३ ७५७ २६डेडिकेटेड हॉस्पिटल ३७० २५३ ११७प्रतिहजार रुग्णवाढीसाठीलागणारे दिवसरुग्णसंख्या दिनांक कालावधी१ हजार १५ मे ६४२ हजार ३० मे १५३ हजार ९ जून १०४ हजार १७ जून ८५ हजार २३ जून ६६ हजार २७ जून ४७ हजार २ जुलै ५८ हजार ७ जुलै ५९ हजार ११ जुलै ४१० हजार १५ जुलै ४

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस