CoronaVirus News: सार्वजनिक ठिकाणी मास्क नसल्यास १०० रुपयांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 23:59 IST2020-06-26T23:59:17+5:302020-06-26T23:59:23+5:30
सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्यास शंभर रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

CoronaVirus News: सार्वजनिक ठिकाणी मास्क नसल्यास १०० रुपयांचा दंड
पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी तोंडावर मास्क लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी बुधवारी विशेष आदेश काढून मास्कसक्ती केल्याचे जाहीर केले आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्यास शंभर रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर मागील दहा दिवसांत पनवेलमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. सध्या महापालिका क्षेत्रात सुमारे १,५०० रुग्ण आढळले असून, ६५ जणांचा मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आयुक्त सुधाकर देशमुख यांनी महापालिका क्षेत्रात मास्क वापरण्याची सक्ती केली आहे. सरकारी, खासगी कार्यालय, हॉस्पिटल, बाजारपेठ, वाहन चालविताना आणि रस्त्यावर चालताना मास्क वापरणे सक्तीचे केले आहे. मास्क घातला नसल्यास यापुढे शंभर रुपयांचा दंड, तसेच कलम १८८ प्रमाणे ही कारवाई केली जाणार आहे. संबंधित कारवाई महापालिकेचे अधिकारी किंवा प्रभारी पोलीस अधिकारी यांच्याकडून करण्यात येईल..
>काहींवर दंडात्मक कारवाई : पालिकेमार्फत मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे. अद्यापही अनेक नागरिक बेजबाबदारपणे मास्क न लावता रस्त्यावर फिरत आहेत. अशा नागरिकांवर ही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.