शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: नवी मुंबईत खासगी डॉक्टरांना विम्याचे संरक्षण देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 00:18 IST

कोरोनाचा धसका । संघटनांकडून प्रयत्न, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : कोरोनामुळे घणसोली येथील खासगी डॉक्टरच्या निधनानंतर शहरातील खासगी डॉक्टरांनीही कोरोनाचा धसका घेतला आहे. प्रशासनाच्या सूचनेनुसार खासगी डॉक्टर रुग्णांना वैद्यकीय सुविधा देत असले तरी एखाद्या पॉझिटिव्ह रुग्णामुळे त्यांनाही संसर्ग होण्याचा धोका आहे. त्यामुळे शासकीय डॉक्टरांप्रमाणेच खासगी डॉक्टरांनादेखील विम्याचे संरक्षण देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. मागील तीन महिन्यांत शहरात ३ हजार ५४३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी १०९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात घणसोली येथील रहिवासी व तुर्भेत दवाखाना असलेल्या एका डॉक्टरचाही समावेश आहे. गेल्या महिन्यात मुंबईत दवाखाना चालवणाऱ्या सीवूड येथील डॉक्टर दाम्पत्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. परंतु बुधवारी नवी मुंबईत सुविधा देणाºया डॉक्टरच्या निधनानंतर शहरातील सर्व डॉक्टर चिंतित झाले आहेत.विविध संघटनांशी संलग्न असलेले सुमारे ५ हजार खासगी डॉक्टर शहरात आहेत. त्यापैकी बहुतांश डॉक्टरांचे स्वत:चे दवाखाने आहेत. लॉकडाऊन दरम्यान त्यांनी स्वत:च्या व परिवाराच्या सुरक्षेसाठी दवाखाने बंद केले होते. परंतु प्रशासनाने त्यांना कारवाईचा इशारा देऊन दवाखाने सुरू ठेवण्यास भाग पाडले. मात्र चार ते पाच फुटांवरून रुग्ण तपासणे प्रत्यक्षात शक्य नसल्याने डॉक्टरांना रुग्णांच्या संपर्कात जावेच लागत आहे. शिवाय कोणता रुग्ण कोरोनाबाधित आहे याचा उलगडाही सहज होत नसल्याने प्रत्येक रुग्ण तपासताना डॉक्टरांना धडकी भरत आहे. त्यानंतरही कोविड योद्धा बनून शहरातील खासगी डॉक्टर रुग्णांना सेवा पुरवत आहेत. त्यामुळे शासकीय डॉक्टरांप्रमाणेच खासगी डॉक्टरदेखील प्रत्यक्षात कोरोनाविरोधातील लढ्यात लढत असताना त्यांनाही विम्याचे संरक्षण देण्याची मागणी डॉक्टरांच्या संघटनांकडून होऊ लागली आहे. तर शासन दखल घेत नसल्यास काही डॉक्टरांनी दवाखाने बंद करून घरी बसण्याचीदेखील तयारी ठेवली आहे. शासकीय डॉक्टरांप्रमाणेच खासगी डॉक्टरही कोरोनाच्या महामारीविरोधात लढत असतानाही शासन त्यांच्या जीविताची हमी का घेत नाही, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी डॉक्टरांच्या विविध संघटना एकत्रित लढा उभारण्याच्या तयारीत आहेत.शासकीय डॉक्टरांप्रमाणेच खासगी डॉक्टरांना शासनाने विम्याचे संरक्षण देणे गरजेचे आहे. किरकोळ दुखण्याने उपचारासाठी दवाखान्यात येणारा कोणता रुग्ण कोरोनाबाधित असेल याचा अंदाज बांधता येत नाही. त्यामुळे रुग्णसेवा देत असताना डॉक्टरांनाही कोरोना होण्याची भीती आहे. अशाच प्रकारातून एका डॉक्टरचे निधन झाल्याने भविष्याच्या दृष्टीने सर्व डॉक्टर चिंतित आहेत.- डॉ. विनायक म्हात्रे, अध्यक्ष,नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा), नवी मुंबई

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या