CoronaVirus News:सार्वजनिक ठिकाणीही निर्जंतुकीकरण फवारणी करण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 23:57 IST2021-04-07T23:57:02+5:302021-04-07T23:57:19+5:30
महानगरपालिकेचा निर्णय : बसडेपोसह मार्केटच्या स्वच्छतेवर लक्ष

CoronaVirus News:सार्वजनिक ठिकाणीही निर्जंतुकीकरण फवारणी करण्याचा निर्णय
नवी मुंबई : शहरात रुग्ण सापडलेल्या घरामध्ये निर्जंतुकीकरण फवारणी केली जात आहे. याशिवाय आता बस डेपो, मार्केट व इतर ठिकाणीही औषध फवारणी करण्यास सुरुवात केली आहे.
कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी महानगरपालिकेने कंटेन्मेंट झोनच्या प्रभावी अंमलबजावणीकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. ज्या ठिकाणी रुग्ण आढळेल तेथे २४ तासांच्या आतमध्ये औषध फवारणी करण्यात यावी, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. यानंतर आता सार्वजनिक ठिकाणांचेही निर्जंतुकीकरण केले जात आहे.
सार्वजनिक शौचालये, मार्केट, बस डेपो, बस स्टॉप व इतर ठिकाणीही सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी करण्यात येत आहे.
कोरोना नियंत्रणासाठी स्वच्छता व औषध फवारणीवर लक्ष देण्याच्या सूचना विभाग अधिकारी, घनकचरा व्यवस्थापन विभाग यांनाही देण्यात आले आहेत.