शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
2
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
3
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा
4
अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत
5
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
6
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
7
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
8
८४ वर्षांपूर्वी दोन भावांनी McDonald'sची केलेली सुरुवात; आज ११९ देशांत ४२००० पेक्षा अधिक आऊटलेस्ट
9
सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी
10
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का
11
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
12
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
13
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
14
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
15
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
16
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
17
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
18
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
19
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
20
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'

CoronaVirus News: रेल्वे स्थानकांवरील चाचणी केंद्रावरील अपुऱ्या सुविधांमुळे धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2021 1:26 AM

घणसोलीत संसर्ग होण्याची भीती

नवी मुंबई : महापालिकेमार्फत काही रेल्वे स्थानकांवर मोफत कोविड चाचणीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र त्याठिकाणी चाचणी करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. तर चाचणीसाठी लागणाऱ्या रांगेतच एकमेकांपासून संसर्ग होण्याची भीती व्यक्त होत आहे.नवी मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागला आहे. त्यामुळे पालिकेकडून अधिकाधिक चाचण्या करण्यावर भर दिला जात आहे. यासाठी नागरी आरोग्य केंद्रांप्रमाणेच वाशी, सानपाडा, तुर्भे, बेलापूर, कोपर खैरणे, घणसोली व रबाळे स्थानकात चाचणी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. मात्र त्याठिकाणी सुविधांचा अभाव असल्याने चाचणीसाठी येणाऱ्या नागरिकांना तसेच चाचणी करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. बहुतेक ठिकाणी प्रतिदिन दोनशेहून अधिक नागरिक कोविड चाचणीसाठी येत आहेत. त्यांना रेल्वे स्थानकाच्या आवारात जागा मिळेल त्याठिकाणी रांगा लावाव्या लागत आहेत. यामध्ये रेल्वे प्रवाशांची वाट अडवली जाऊन त्यांनाही संसर्ग पसरण्याचा धोका उद्भवत आहे. तर गैरसोयी बघूनच चाचणीला आलेले अनेकजण परत जात आहेत. असाच प्रकार घणसोली रेल्वे स्थानकातील चाचणी केंद्रावर मागील काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. त्याठिकाणी चाचणीला येणाऱ्या नागरिकांना भरउन्हात एक ते दीड तास रांगेत उभे राहावे लागत आहे. तर थोडीफार सावली मिळविण्याच्या प्रयत्नात सामाजिक अंतर राखण्याकडे दुर्लक्ष होत आहे. शिवाय सॅनिटायझर व पिण्याच्या पाण्याचीदेखील सोय नसल्यानेही नागरिकांचे हाल होत आहेत. तर चाचणीच्या ठिकाणी प्रशासनाकडून पंखा पुरवण्यात आला नाही. यामुळे पीपीई कीट घालून तिथे काम करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांची दयनीय अवस्था होत आहे. यामुळे सामाजिक कार्यकर्ते अभिजित पाटील यांनी बुधवारी त्यांना वापरासाठी पंखा व खुर्च्या दिल्या. मात्र चाचणी बंद झाल्यावर हे साहित्य ठेवून घेण्यास रेल्वे स्थानकातील तिकीट खिडकीमधील कर्मचाऱ्यांनी नकार दिला. त्यामुळे घणसोली सेक्टर ४ येथील रात्र निवारा केंद्रात चाचणी केंद्र सुरू करण्याची मागणी होत आहे. त्याठिकाणी चाचणी सुरू केल्यास आरोग्य कर्मचारी व नागरिक यांची गैरसोय दूर होऊ शकते.रेल्वे स्थानकाच्या जागेत कोविड चाचणी केंद्रावर अनेक गैरसोयी आहेत. याचा त्रास आरोग्य कर्मचाऱ्यांसह नागरिकांना होत आहे. त्यामुळे घणसोली सेक्टर ४ येथील रात्र निवारा केंद्रात चाचणी केंद्र सुरू करावे, अशी मागणी पालिकेकडे केली आहे. प्रशासनाने त्यावर सकारात्मक निर्णय घेतल्यास चाचणीसाठी येणाऱ्यांची गैरसोय दूर होईल.- सचिन कटारे, सरचिटणीस- रिपाइं, युवक आघाडी.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या