CoronaVirus News : अशोक जालनावाला यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 00:17 IST2020-06-24T00:17:35+5:302020-06-24T00:17:48+5:30

त्यांच्या पार्थिवावर संध्याकाळी बेलापूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

CoronaVirus News : Ashok Jalnawala passes away | CoronaVirus News : अशोक जालनावाला यांचे निधन

CoronaVirus News : अशोक जालनावाला यांचे निधन

नवी मुंबई : शहराच्या जडणघडणीचे मूर्तिमंत साक्षीदार असलेले नवी मुंबईचे ज्येष्ठ पत्रकार अशोक जालनावाला (७२) यांचे मंगळवारी दुपारी कोरोनाने निधन झाले. त्यांच्यापश्चात पत्नी, दोन मुले, सुना, मुलगी व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर संध्याकाळी बेलापूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
गेल्या आठवड्यात त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांना नेरुळच्या डी.वाय.पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर, १८ जून रोजी त्यांना सीबीडीच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते. येथे उपचार सुरू असतानाच मंगळवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. पत्रकारितेच्या पन्नास वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासात त्यांनी विविध विषयांना वाचा फोडली. आपल्या लेखणीतून त्यांनी सिडको, बीएमटीसी, प्रकल्पग्रस्तांचा संघर्ष, एपीएमसी आदी विषयांवर प्रभावी लेखन केले होते.

Web Title: CoronaVirus News : Ashok Jalnawala passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.