शहरं
Join us  
Trending Stories
1
अन्नधान्याच्या वाढलेल्या किंमती महागाई रोखण्यात अडथळा; RBI गव्हर्नरांचे महत्वाचे वक्तव्य
2
मोठी बातमी! पंढरपूर- कराड रोडवर भीषण अपघात; सहा महिला जागीच ठार, एक गंभीर
3
उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली; आक्रमक ओबीसी आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्ग रोखला
4
Reliance Jio : जिओचे नेटवर्क बंद!; इंटरनेटपासून फायबरपर्यंत सर्वच बंद झाल्याने युजर्सचा संताप
5
शेतकऱ्यांनो खात्यात खटाखट खटाखट २००० रुपये आले का? मोदींनी एक बटन दाबले, २० हजार कोटी वळते केले
6
सन्मान निधीनंतर आता कोट्यवधी शेतकऱ्यांना NDA सरकार देणार आणखी एक गिफ्ट?
7
'अ‍ॅनिमल पार्क'संदर्भात रणबीर कपूरच्या सहकलाकाराने दिली मोठी अपडेट, म्हणाला- "सिनेमाची कथा..."
8
पुढच्यावेळी रॉबर्ट वाड्रा संसदेत दिसणार?; प्रियंका गांधी वायनाडला जाताच पतीची घोषणा
9
लोकसभा अध्यक्षाची निवड कशी केली जाते? कोणते अधिकार मिळतात? जाणून घ्या...
10
सरकारचा एक निर्णय अन् लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला; RTE प्रवेश पुन्हा रखडले
11
वयाच्या चाळीशीतही अभिनेत्रीच्या हॉटनेसची चर्चा; साऊथ नंतर आता बॉलिवूडमध्येही बोलबाला
12
मुंबई, पाटणा, जयपूर, कोलकाता...देशभरातील 40 विमानतळांना बॉम्बने उडवण्याची धमकी
13
वर्षा गायकवाडांचा आमदारकीचा राजीनामा; काँग्रेस- शिवसेनेचे आणखी काही आमदार राजीनामा देणार
14
खळबळजनक! T20 World Cup मध्ये मॅच फिक्सिंगचा प्रयत्न, वेगवेगळ्या नंबरवरून आले फोन
15
ना आलिया भट, ना ऐश्वर्या अन् नाही कतरिना, ही आहे भारतातील सर्वात महागडी अभिनेत्री
16
फडणवीसांशिवाय मंत्रिमंडळात भाजप असणे अशक्य; राष्ट्रवादीच्या मंत्र्याचे खळबळजनक वक्तव्य
17
बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे लोकार्पण कधी? उद्धव ठाकरेंनी केली बांधकामाची पाहणी
18
सुख-शांती हिरावून घेऊ शकतं स्मार्टफोनचं व्यसन; 'या' आजारांचा धोका, काय आहे Nomophobia?
19
पश्चिम बंगालमध्ये नवा ट्विस्ट! CM ममता बॅनर्जी भाजपा खासदाराच्या घरी; चर्चांना उधाण
20
"पप्पा फक्त एकदा परत या आणि..."; शहीद वडिलांना आजही व्हॉईस मेसेज पाठवतो ७ वर्षांचा लेक

CoronaVirus Lockdown News: कडक निर्बंधांची अंमलबजावणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2021 1:39 AM

दुसऱ्या दिवशी समाधानकारक प्रतिसाद; व्यापाऱ्यांमधील नाराजी कायम

नवी मुंबई : ब्रेक दि चेनअंतर्गत लागू केलेल्या कडक निर्बंधांची नवी मुंबईमध्ये दुसऱ्या दिवशी समाधानकारक अंमलबजावणी सुरू झाली. पोलीस व महानगरपालिका पथकाने कारवाई सुरू केल्यामुळे जीवनावश्यक वस्तू वगळता इतर दुकाने बंद करण्यात आली. या निर्बंधांविषयी व्यापाऱ्यांमध्ये नाराजी कायम असून अनेकांनी अर्धे शटर उघडून व्यवसाय सुरूच ठेवला होता. नवी मुंबईमध्ये कोरोनाचा विस्फोट झाला आहे. प्रतिदिन एक हजारपेक्षा जास्त रुग्ण वाढू लागले आहेत. रुग्णालयीन यंत्रणेवरील ताण वाढू लागला आहे. आयसीयू व व्हेंटिलेटर्स बेड मिळविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी महानगरपालिकेने कडक उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. शासनाने जीवनावश्यक वस्तू वगळून इतर व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर महानगरपालिका प्रशासनाने या नियमांची अंमलबजावणी सुरू केली आहे. मंगळवारी नागरिकांना माहिती नसल्यामुळे अनेक दुकाने सुरूच ठेवण्यात आली होती. यानंतर महानगरपालिका व पोलीस प्रशासनाने प्रत्येक नोडमध्ये जाऊन जनजागृती करण्यास सुरुवात केली. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी कमी करावी लागेल, असे आवाहन करण्यास सुरुवात केली आहे. आवाहन करूनही जे ऐकत नाहीत त्यांच्यावर कारवाई सुरू केली आहे. यामुळे बुधवारी कडक निर्बंधांची समाधानकारक अंमलबजावणी सुरू झाली आहे. हार्डवेअर, फर्निचर, स्टेशनरी व इतर अनेक दुकाने दिवसभर बंद होती. बहुतांश सलूनही बंदच होते. काही सलून व्यवसायिकांनी अर्धे शटर उघडून ग्राहकांना सेवा देण्यास सुरुवात केली होती. सीबीडी, नेरुळ, जुईनगर, वाशी व इतर ठिकाणीही काही दुकानदारांनी अर्धे शटर उघडून व्यवसाय सुरू ठेवला होता. शहरात नेहमीपेक्षा कमी गर्दी दिसत होती. परंतु  सायंकाळी सानपाडा, नेरुळ व इतर परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांनी नेहमीप्रमाणे गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. सायंकाळी मनपाचे पथक कारवाई करत नसल्याचा गैरफायदा घेतला जात आहे. सानपाडा रेल्वे स्टेशनच्या बाहेर सामाजिक अंतर नियमांचे सर्रास उल्लंघन करण्यात येत असल्याचे दिसले. गर्दीचे नियम मोडणाऱ्या फेरीवाल्यांवरही कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. जे नियम मोडतील त्यांच्यावर निष्पक्षपणे कारवाई करावी. अन्यथा निर्बंधांचा हेतू साध्य होणार नाही अशा प्रतिक्रियाही नागरिक व्यक्त करत आहेत. वाहनांची संख्या नियंत्रणातकडक निर्बंध लागू केल्यानंतर शहरातील अंतर्गत रोडवर वाहतूक काही प्रमाणात कमी झाली आहे. दुकाने बंद केल्यामुळे त्याचा परिणाम रिक्षा वाहतुकीवरही पडला असून व्यवसाय कमी झाल्याची प्रतिक्रिया रिक्षाचालकांनी दिली. सायन-पनवेल महामार्ग व पामबीच रोडवरही नेहमीपेक्षा काही प्रमाणात वाहनांची संख्या कमी झालेली पाहावयास मिळाली.पोलिसांकडूनही कारवाई सुरूवारंवार आवाहन करूनही अनेक दुकानदार व्यवसाय सुरूच ठेवत आहेत. रात्री अनेक जण अद्याप समूहाने फिरत आहेत.  नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांनी करण्यास सुरुवात केली आहे. परंतु यानंतरही न ऐकणाऱ्यांना पोलिसी खाक्या दाखविण्यासही सुरुवात केली आहे. बेलापूरसह शहरात अनेक ठिकाणी पोलिसांनी नियम न पाळणाऱ्यांना प्रसाद देण्यास सुरुवात केली आहे. शहरातील कोरोनाची स्थिती एकूण रुग्ण    ७२४५०सरासरी प्रतिदिन रुग्ण    १०७१सक्रिय रुग्ण    ९६२०कोरोनामुक्तीचे प्रमाण    ८५ टक्के सरासरी प्रतिदिन चाचणी    ६८६९एकूण चाचणी    ७,२३१५९रुग्ण दुपटीचा कालावधी    ४८ 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या