शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: लॉकडाऊनमुळे रिक्षा चालकांवर आर्थिक संकट, उपासमारीची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 01:00 IST

नवी मुंबई : लॉकडाऊनचा परिणाम रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर मोठ्या प्रमाणात झाला असून, उपजीविका बंद असल्याने आर्थिक संकट कोसळले ...

नवी मुंबई : लॉकडाऊनचा परिणाम रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर मोठ्या प्रमाणात झाला असून, उपजीविका बंद असल्याने आर्थिक संकट कोसळले असून, उपासमारीची वेळ आली आहे. रिक्षा चालकांना सावरण्यासाठी शासनाने उपयोजना राबविण्याची मागणी रिक्षा, टॅक्सी चालक मालक संघटनांनी केली आहे.नवी मुंबई शहरात गेल्या काही वर्षांत रिक्षांचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढले असून, रिक्षा व्यवसाय हे उदरनिर्वाहाचे साधन बनले आहे. अनेकांनी रिक्षाचा परवाना काढून रिक्षाच्या खरेदीसाठी बँकांकडून कर्ज घेऊन रिक्षा खरेदी केल्या आहेत, तर अनेक जण रिक्षा भाड्याने घेऊन व्यवसाय करीत आहेत. या व्यवसायावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह, घरभाडे, औषधोपचार, मुलांचे शिक्षण आदी सर्वच अवलंबून आहे. यामुळे कर्जाचे हप्ते, कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण, घरभाडे, विद्युत बिल, औषधोपचार असे अनेक प्रश्न रिक्षा चालकांपुढे निर्माण झाले आहेत. सुरुवातीला घेण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात अनेक सामाजिक संघटना, समाजसेवकांच्या वतीने अन्नधान्य आणि आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले होते. त्यामुळे हातावर पोट अवलंबून असलेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. शासनाच्या माध्यमातून काही उपायोजना करून आर्थिक संकटात सापडलेल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना दिलासा देण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे.यामध्ये प्रामुख्याने थकलेल्या कर्जाच्या हप्त्याचे व्याज माफ करून थकीत हप्ते इन्शुरन्स कंपन्यांकडून घेण्यात यावेत, तसेच पुढील काळातील हप्ते भरण्यासाठी वाढीव मुदत देण्यात यावी, तसेच रिक्षा, टॅक्सीची पासिंग करण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशा मागण्या संघटनांच्या वतीने करण्यात येत आहेत.लॉकडाऊनमुळे रिक्षा व टॅक्सी चालकांचे उत्पन्न पूर्ण बंद असल्याने थकीत हप्ते भरणे शक्य होणार नाही. यासाठी या थकीत हप्त्यांचे व्याज माफ करून इन्शुरन्स कंपन्यांपासून हप्त्यांचा भरणा करण्यात यावा, पुढील हप्ते भरण्यासाठी, तसेच पासिंगसाठीही मुदतवाढ मिळावी, यासाठी शासनाने आदेश काढावेत, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संबंधित विभागांच्या प्रमुख नेत्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.दिलीप आमले, (अध्यक्ष नवी मुंबई रिक्षा चालक मालक सेवाभावी संस्था)

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसauto rickshawऑटो रिक्षाbusinessव्यवसाय