शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Crime: 'तो' व्हिडीओ अन् तीन कोटी, मुंबईत सीएने आयुष्यच संपवले, सुसाईड नोटमध्ये काय?
2
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानी युद्धनौका बंदरातच का नांगरलेल्या होत्या? मोठी माहिती समोर, लढायच्याच स्थितीत नाहीत
3
बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली, दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला; पुढे जे झालं ते ऐकून उडेल अंगाचा थरकाप
4
डॅालर्स नाही लोकल करन्सी… रशियाच्या प्लाननं ट्रम्प यांचा तिळपापड, भारताला होणार का मोठा फायदा?
5
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
6
तुलसी Is Back! १७ वर्षांनी 'क्योंकी सास भी...'चा सीक्वल, स्मृती इराणीची पहिली झलक, 'या' दिवशी सुरू होणार
7
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
8
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
9
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
10
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
11
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
12
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
13
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
14
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
15
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
16
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
17
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
18
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
19
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
20
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय

Coronavirus: संकटात सरसावले मदतीचे हात; अनेकांनी धाडसाने कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 04:33 IST

35,000 जणांना दोन वेळचे जेवण घरपोच पुरवले जात होते. याकरिता स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात आली होती. 3,600 हुन अधिक जण बरे होऊन घरी परतले आहेत.

सूर्यकांत वाघमारे

नवी मुंबई : लॉकडाऊनच्या काळात गरजूंना मदतीसाठी हात पुढे करून नवी मुंबईकरांनी आदर्श निर्माण केला आहे. तर कोविड योद्ध्यांनीही बाधितांना धीर देऊन कोरोनावर मात करण्याचे बळ दिले. त्यामुळे अनेकांनी धाडसाने कोरोनावर मात केलेली आहे.२३ मार्चला लॉकडाऊन घोषित करण्यात आला. दुसऱ्याच दिवसापासून शहरातील वर्दळीचे रस्ते निर्मनुष्य झाले.

यादरम्यान एकट्या राहणाºया व्यक्तींसह चाकरमानी, झोपड्यांतील कुटुंबे अशा असंख्य व्यक्तींपुढे पोटाची खळगी भरवण्यासह इतरही गरजा निर्माण झाल्या होत्या. अशावेळी त्यांना मदतीचा हात देण्यासाठी पाहता पाहता शेकडो नागरिकांनी व सामाजिक संघटनांच्या सदस्यांनी घराबाहेर पाऊल टाकले. आलेल्या संकटावर मात करत त्यांच्याकडून गरजूंपर्यंत मदत पोचवली जात होती. त्यामध्ये अन्न धान्यासह कपडे व इतर जीवनावश्यक वस्तूंचा समावेश होता. त्याशिवाय रुग्णवाहिका व इतर वैद्यकीय मदत पुरवण्याचेही काम अनेकांनी केले. त्यात पोलीस व पालिकाही आग्रही होती. पालिकेकडून नियमाने दररोज सुमारे ३५ हजार जणांना दोन वेळचे जेवण घरपोच पुरवले जात होते. याकरिता स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात आली होती. त्याकामी अनेक ठिकाणच्या गुरुद्वार व तिथल्या यंत्रणा उपयुक्त ठरली. तर काही संघटनांची मनुष्याप्रमाणेच प्राण्यांना जीवदान देण्याचे काम या लॉकडाऊनच्या कालावधीत प्रामाणिकपणे केले. लोकप्रनिधींनी, वैद्यकीय संघटनांनी देखील आर्सेनिक अल्बमच्या गोळ्या प्रभागात वाटून नागरिकांची रोगप्रतिकार शक्ती वाढण्याचा प्रयत्न केला. तर एपीएमसी मधील काही व्यापाऱ्यांनी पालिकेला उपयुक्त साहित्य पुरवून गरजूंना सुरु असलेल्या मदतीत खंड पडू दिला नाही.

लॉकडाऊन दरम्यान कुठेही नियमांचे उल्लंघन अथवा इतर अनुचित प्रकार घडू नये याकरिता सर्वत्र पोलिसांचा बंदोबस्त होता. एकीकडे कर्तव्य बजावत असतानाच दुसरीकडे गरजूंना मदतीचा हात दिला जात होता. रस्त्यावरील भिकारी, झोपडपट्या याठिकाणी तयार अन्न वाटताना खाकीतली माणुसकी दिसत होती. तर पालिकेचे सफाई कामगार, अग्निशमन दल व वैद्यकीय पथक हे खºया अर्थाने कोविड योद्धा बनले होते. कोरोनाबाबत गैरसमज असल्याने नागरिक भयभीत होत होते. अशावेळी दाखल रुग्णांना उपचारास धीर देण्याचे काम वैद्यकीय पथक करत होते. त्यामुळे उपचार घेऊन ३ हजार ६०० हून अधिक जण बरे झाले आहेत.35,000 जणांना दोन वेळचे जेवण घरपोच पुरवले जात होते. याकरिता स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात आली होती. 3,600 हुन अधिक जण बरे होऊन घरी परतले आहेत. तर घणसोलीतील कोरोना पॉझिटिव्ह गरोदर महिलेची यशस्वी प्रसूती झाली. 1,300 पैकी ११०० हून अधिक वृद्धांनी कोरोना विरोधातील लढाई जिंकली आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस