शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
2
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
3
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
4
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
5
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
6
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
7
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
8
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
9
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
10
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
11
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
12
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
13
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
15
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
16
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
17
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
18
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
19
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
20
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल

Coronavirus: लॉकडाउनमध्येही शहराला भिकाऱ्यांचा विळखा; कोरोना पसरण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2020 1:55 AM

नवी मुंबईत मार्केटच्या ठिकाणी घोळक्याने मांडले ठाण

नवी मुंबई : मागील काही दिवसांत अचानक शहरातील भिकाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी राहणारे हे भिकारी मार्केट परिसरात ठाम मांडून बसत आहेत. त्यांच्याकडून भीक मागताना नागरिकांना जाणीवपूर्वक स्पर्श केला जात असल्याने कोरोनाचा संसर्ग पसरवण्यास ते कारणीभूत ठरण्याची भीती व्यक्त होत आहे.

शहरात कोरोनाचा संसर्ग पसरणार नाही, याची पुरेपूर खबरदारी प्रशासन घेत आहे; परंतु लॉकडाउन लागल्यापासून हे भिकारी प्रशासनाकडून दुर्लक्षित झाले आहेत. यामुळे सायन-पनवेल मार्गावरील वाशी, सानपाडा, नेरुळ येथील पुलाखालील जागा, घणसोली कोपरखैरणे येथील पुलाखाली तसेच इतर ठिकाणी भिकाºयांच्या वस्त्या तयार झाल्या आहेत. लॉकडाउन लागल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस त्यांना समाजसेवकांकडून मुक्कामाच्या जागी जेवण मिळत होते; परंतु काही दिवसांपासून त्यांना मिळणारे जेवण बंद झाले आहे. यामुळे शहरातील ठिकठिकाणी भरणारे बाजार भिकाºयांचा अड्डा ठरू लागले आहेत. सकाळच्या वेळी ग्राहकांची गर्दी होत असल्याचे साधून हे भिकारी त्या ठिकाणी जमत आहेत. त्यांच्याकडून नागरिकांना भीक देण्यास भाग पाडण्यासाठी वेगवेगळे प्रकार केले जात आहेत. पादचाºयांचा हात पकडणे, लहान मुलांसह उभे राहून रस्ता अडवणे, असे प्रकार सुरू आहेत. अशा प्रकारे दिवसभरात अनेकांना स्पर्श केला जात आहे. अशा वेळी त्यांना हटकल्यास भिकाºयांच्या टोळ्या तिथे जमा होत आहेत. यामुळे त्यांच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.बेगर्स होममध्ये रवानगी करण्याची मागणीनेरुळमध्ये काही मटण मार्केटच्या आवारात अशाच प्रकारे भिकारी नागरिकांना त्रास देत असल्याने कोरोना पसरण्याची भीती सामाजिक कार्यकर्ते कौस्तुभ मोरे यांनी व्यक्त केली आहे; परंतु प्रशासनाकडून या भिकाºयांच्या बंदोबस्त करण्याकडे कानाडोळा होत आहे.परिणामी, हे भिकारी कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्यास ते अनेकांना संसर्ग पसरवू शकतात. त्यांच्यापासून शहराला असलेला संभाव्य धोका टाळण्यासाठी त्यांची बेगर्स होममध्ये रवानगी करून शहर भिकाºयांच्या विळख्यातून सोडवण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNavi Mumbaiनवी मुंबई