शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
4
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
5
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
6
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
7
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
8
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
9
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
11
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
12
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
13
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
14
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
15
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
16
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
17
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
18
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
19
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
20
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन

coronavirus: इनऑर्बिट, ग्रँड सेंट्रल मॉलवर कारवाई, पालिकेची मोहीम : ७ बारकडून दंड वसूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 02:45 IST

Coronavirus : कोरोनाविषयी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पालिकेने धडक मोहीम सुरू केली आहे. वाशीतील इनऑर्बिट व सीवूडमधील ग्रँड सेंट्रल मॉल व्यवस्थापनाकडून प्रत्येकी ५० हजार रुपये दंड वसूल केला आहे.

नवी मुंबई : कोरोनाविषयी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पालिकेने धडक मोहीम सुरू केली आहे. वाशीतील इनऑर्बिट व सीवूडमधील ग्रँड सेंट्रल मॉल व्यवस्थापनाकडून प्रत्येकी ५० हजार रुपये दंड वसूल केला आहे. शहरातील सात बार व रेस्टॉरंट व्यवस्थापनाकडूनही दंड वसूल करण्यात आला असून यापुढेही नियम धाब्यावर बसविणारांवर कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.      शुक्रवारी सायंकाळी  व शनिवार, रविवारी मॉल्स व डिपार्टमेंट स्टोअर्समध्ये कोरोना चाचणी करणाऱ्यांना प्रवेश देणे बंधनकारक आहे. परंतु अनेक मॉल्समध्ये चाचणी न करता प्रवेश दिल्याचे निदर्शनास आले आहे. पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी शनिवारी अचानक सीवूडमधील ग्रँड सेंट्रल मॉलला भेट दिली. तेथील प्रवेशद्वारावरील कोरोना चाचणी व इतर उपाययोजनांचा आढावा घेतला. पाहणी करताना पालिकेच्या पथकाला चाचणी न झालेल्या नागरिकांनाही आतमध्ये प्रवेश दिल्याचे निदर्शनास आले. यामुळे मॉल व्यवस्थापनाकडून ५० हजार रुपये दंड वसूल केला. वाशीतील इनऑर्बिट मॉलला ही अचानक भेट देण्यात आली. तेथील चाचणी न करताच काही नागरिकांना मॉलमध्ये प्रवेश दिल्याने तेथेही ५० हजार रुपये दंड वसूल केला. हॉटेल चालकांकडून मोठ्या प्रमाणात नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. यामुळे पालिकेने नियम तोडणारांविरोधात मोहीम सुरू केली आहे. कल्पना बार, साई हॉटेल आणि बार, पोटोबा फास्ट फूड, बेलापूरमधील रूड लंग बार, सानपाडामधील कृष्णा बार, कोपरखैरणेमधील क्लासिक रेस्टॉरंट आणि बार, समुद्र रेस्टॉरंट आणि बार अशा सात बार व्यवस्थापनाकडून प्रत्येकी ५० हजार रुपये दंड वसूल केला आहे. 

कारवाई सुरूच राहणार कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी नागरिकांनी व सर्व व्यवसायिकांनीही नियमांचे काटेकोर पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.  नियमांचे पालन केले नाही तर कारवाई सुरूच राहणार असल्याचेही महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbaiनवी मुंबई