शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: नवी मुंबईत ६२६ रुग्ण घेत आहेत घरीच उपचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2020 00:05 IST

coronavirus Navi Mumbai : नवी मुंबई महानगरपालिकेने कोरोना नियंत्रणासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. रुग्णांची संख्या लक्षात घेऊन उपचार केंद्रे सुरू केली आहेत. रुग्णांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा जास्त बेड शहरात उपलब्ध आहेत.

- नामदेव मोरे नवी मुंबई  : कोरोना रुग्णांवर उपचार करताना गृहविलगीकरणासही प्राधान्य मिळू लागले आहे. आतापर्यंत १४ हजार ७ रुग्णांनी घरामध्ये उपचार घेऊन कोरोनावर मात केली असून सद्य:स्थितीमध्ये ६२६ जणांवर उपचार सुरू आहेत.नवी मुंबई महानगरपालिकेने कोरोना नियंत्रणासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. रुग्णांची संख्या लक्षात घेऊन उपचार केंद्रे सुरू केली आहेत. रुग्णांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा जास्त बेड शहरात उपलब्ध आहेत. रुग्णालयाबरोबरच गृहविलगीकरणासही प्राधान्य देण्यात येत आहे. आतापर्यंत ७,९४५ पुरुषांनी व ६,०६१ महिलांनी घरामध्ये उपचार घेऊन कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीमध्ये ३१ टक्के रुग्णांवर घरामध्ये उपचार सुरू असून, मनपाने त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी विशेष यंत्रणा तयार केली आहे.  होम आयसोलेशन सुरू असलेल्या रुग्णांना नागरी आरोग्य केंद्राच्या वतीने औषधे पुरविण्यात येतात. या रुग्णांशी संवाद साधण्यासाठी काॅल सेंटर सुरू करण्यात आले आहे. काॅल सेंटरच्या माध्यमातून प्रतिदिन या रुग्णांशी संवाद साधला जात असून, या रुग्णांच्या उपचारावर लक्ष दिले जात आहे.     - अभिजित बांगर, आयुक्त, महापालिका   प्रशासनाची गृहविलगीकरणासाठी काय व्यवस्था ? नवी मुंबई महानगरपालिकेने गृहविलगीकरण सुरू असलेल्या रुग्णांची काळजी घेण्यासाठी काॅल सेंटर सुरू केले आहे. प्रत्येक रुग्णास नियमित संपर्क साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली जात आहे.  गृहविलगीकरण करण्यात येणाऱ्या रुग्णांना महानगरपालिकेच्या वतीने पाच दिवसांचे औषणांचे किट उपलब्ध करून देण्यात येते. ही औषधे देण्याबरोबर नियमितपणे त्यांच्या प्रकृतीची चाैकशी करण्यात येत आहे.  गृह विलगीकरणासाठी काय अटी?गृहविलगीकरणासाठी रुग्णाच्या घरामध्ये स्वतंत्र खोली असणे आवश्यक आहे. काळजी घेण्यासाठी केअर गिव्हर असणे आवश्यक आहे. औषध वेळेवर,   पेपर व इतर साहित्य वेळेवर देण्यासाठी काळजीवाहक गरजेचा आहे. साैम्य लक्षणे असणाऱ्या व कोणतीही सहव्याधी नसणाऱ्यांना गृहविलगीकरण केले जाते. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbaiनवी मुंबईHealthआरोग्य