शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

Coronavirus: लग्न समारंभावर कोरोनाच्या भीतीचे सावट; मंगल कार्यालयांचा सावध पवित्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2020 07:28 IST

अनेकांनी केले बुकिंग रद्द

नवी मुंबई :  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे लग्न समारंभावर भितीचे सावट आहे. याचा परिणाम म्हणून अनेकांनी पूर्वनियोजित सोहळे स्थगित केले आहेत, तर मंगल कार्यालयांनीही सावध पावित्रा घेत, पूर्वी केलेले बुकिंग रद्द केले आहे. नवी मुंबई, पनवेलमध्ये दिवाळीनंतर कोरोनाच्या रुग्णांत वाढ हो आहे. त्यामुळे संबंधित महापालिकांनी नियम कठोर केले आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे सूचना नागरिकांना केल्या आहेत. नवी मुंबईसह पनवेल विभागात जवळपास १,८५0 मंगल कार्यालये आहेत. दिवाळीनंतर लग्नाचे १0 मुहूर्त आले आहेत. त्यामुळे अनेक कुटुंबांनी विवाहसाठी लग्नाचे हॉल बुक केले आहेत. मात्र, दुसऱ्या लाटेची चर्चा सुरू झाल्याने अनेकांनी मुहूर्त पुढे ढकलले आहेत. काहींनी याच मुहूर्तावर कोर्टात अगदी साध्या पद्धतीने विवाह समारंभ उरकण्याचा निर्णय घेतला आहे, तर काही मंगल कार्यालयांनीही पूर्वी घेतलेली बुकिंग सुरक्षिततेच्या कारणास्तव रद्द केले आहेत. शहरातील काही बड्या मंगल कार्यालयांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चपासूनच बुकिंग घेणे बंद केले आहे.

दिवाळीनंतर लग्नाचे १० मुहूर्तडिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च महिन्यांमध्ये मुहूर्त पाहून मोठ्या प्रमाणात लग्न समारंभ पार पडतात. मात्र या महिन्यांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली गेल्याने अनेक कुटुंबांमध्ये लग्नाचे मुहूर्त पुढे ढकलले गेले आहेत. काही कुटुंबांमध्ये कोर्टात साध्या पद्धतीने लग्न उरकून घेण्याचा निर्णय घेतला गेला आहे. यामुळे मंगल कार्यालये ओस पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. 

हॉलच्या बुकिंगच्या वेळीच नियमाच्या सूचना संबंधितांना दिल्या जातात, तसेच प्रत्येकाला मास्क लावणे आणि शारीरिक अंतर राखणे बंधनकारक आहे, शिवाय हॉलवर तपामान मोजण्याचे यंत्र बसविले आहे. -गिरीश बद्रा  लोहाना समाज हॉल, कोपरखैरणे

कोरोनाविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाते. सरकारच्या निर्देशानुसार लग्न समारंभासाठी केवळ पन्नास लोकांना सहभागी होण्याची परवानगी आहे. त्यानुसार  नागरिकही सजग झाले आहेत. त्याचा आनंद आहे.  - विशाल टोळे, बेलापूर

मंगल कार्यालये आधीच बुकबहुतेक मंगल कार्यालयांमध्ये मार्चनंतरचे बुकिंग केले गेले आहे. मात्र हे बुकिंगही कायम राहील का याची खात्री मंगल कार्यालय संचालकांना नाही. दिवाळीनंतर रुग्ण पुन्हा वाढू लागल्याने काही जणांनी चक्क मंगल कार्यालयांचे बुकिंग रद्द केले आहे. यामुळे मंगल कार्यालयांचे मालक, व्यावसायिक व कामगार चिंतेत पडले आहेत. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस