शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

Corona Vaccination: नवी मुंबईतील सर्व लसीकरण केंद्रे बंद; नवीन डोस येण्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 1:38 AM

लसीकरण थांबल्यामुळे नागरिकांनी व्यक्त केली नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : महानगरपालिकेकडील लसीचे डोस संपल्यामुळे शहरातील सर्व ४२ लसीकरण केंद्रे बंद करण्यात आली आहेत. नवीन डोस मिळेपर्यंत लसीकरण बंद राहणार असल्याचे आरोग्य विभागो स्पष्ट केल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त  केली आहे.            नवी मुंबई पालिकेने शहरातील जास्तीत जास्त नागरिकांना लस उपलब्ध व्हावी, यासाठी तब्बल ४२ केेंद्रे सुरू केली होती. यामध्ये मोफत लस देणारी पालिकेची २६ व सशुल्क लस देणाऱ्या १६ खासगी केंद्रांचा समावेश होता. गुरुवारी सायंकाळपर्यंत १ लाख ४३ हजार ७२१ जणांचे लसीकरण पूर्ण झाले होते. शुक्रवारी सकाळपर्यंत फक्त ५०० डोस उपलब्ध हाेते. यामुळे मनपाच्या तीन रुग्णालयांत लसीकरण सुरू होते. वाशी रुग्णालयामध्ये लस घेण्यासाठी प्रचंड गर्दी जमली होती. दुपारनंतर डोस संपल्यानंतर शहरातील सर्व लसीकरण केंद्रे बंद केली आहेत. पालिकेने रोज १० हजार जणांना लस देता येईल, असे नियोजन केले आहे. मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांची एकत्रित नोंदणी करण्याची तयारी होती. नागरिकांना घराजवळ लस घेता यावी, यासाठी सर्व नागरी आरोग्य केंद्रे, ऐरोली, वाशी व नेरुळमधील मनपा रुग्णालय व खासगी रूग्णालयांमध्ये लस उपलब्ध केली होती. शासनाकडून जास्तीत जास्त डोस उपलब्ध व्हावे, यासाठीही पाठपुरावा सुरू केला आहे. परंतु वेळेत डोस न मिळाल्यामुळे लसीकरण थांबविण्यात आले आहे.वाशीच्या महापालिका रुग्णालयात गर्दीनवी मुंबई : कोरोना लसींचा डोस घेण्यासाठी नागरिकांनी वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयात शुक्रवारी दुपारी एकच गर्दी केली होती. सामाजिक अंतर न राखल्यामुळे कोविड नियमांचा अक्षरश: फज्जा उडाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. घणसोली, कोपरखैरणे, ऐरोली, नेरूळ आणि वाशी येथील अनेक नागरिकांना लसीचा साठा संपल्यामुळे निराश होऊन परतावे लागले. नवी मुंबईत एका दिवसाला ८ हजारांहून अधिक लोकांना डोस दिले जातात. आतापर्यंत दीड लाखाहून अधिक जणांनी लसीचे डोस घेतल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.लस नसल्याने जावे लागले परत कोरोना लस मिळावी, यासाठी नागरिक लसीकरण केंद्रांना भेट देत आहेत. परंतु सलग दोन दिवस लस संपल्याचे सांगण्यात येत असल्यामुळे अनेकांना नाराज होऊन घरी परत जावे लागले. लस केव्हा येणार, याविषयीही नागरिक विचारणा करू लागले आहेत. परंतु आरोग्य विभागास ठोस माहिती नसल्यामुळे त्यांना नागरिकांना काहीही आश्वासन देता येत नसल्याचे पाहावयास मिळत होते.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस